चेअरमनपदाची कारकिर्द संकल्पपूर्तीची ! दूध उत्पादकांना न्याय देणारी !!
schedule17 May 23 person by visibility 900 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी संघाच्या चेअरमनपदाचा गेल्या दोन वर्षाचा कालावधी हा दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक न्याय देणारी ठरली. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत सात वेळा दूध खरेदी दरात वाढ, जातीवंत म्हैस खरेदीच्या अनुदानात पाच हजार रुपयांची वाढ, उपपदार्थ निर्मितीत वाढ अशा दूध उत्पादकांच्या हिताच्या निर्णयामुळे चेअरमनपद यशस्वी ठरले. चेअरमपदाची कारकिर्द ही संकल्पपूर्तीची ठरली…’अशी भावना गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.
गोकुळचे चेअरमन म्हणून विश्वास पाटील यांच्या चेअरमनपदाचा दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला.सत्ता फॉर्म्युलानुसार पाटील यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. पाटील यांनी मंगळवारी (१६ मे) रोजी चेअरमनपदाचा राजीनामा मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश गोडबोल यांच्याकडे दिला. हा राजीनामा संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर होतो. या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी गेल्या दोन वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला.
पाटील म्हणाले, “जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढविणाऱ्या आणि दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या गोकुळमधील सत्तांतरानंतरचे दुसरे वर्ष हे संकल्पपूर्तीचे आणि सर्वच घटकांमध्ये संघाप्रती विश्वास वृद्धीगंत करणारे ठरले. दोन वर्षापूर्वी गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नेते मंडळींनी चेअरमनपदाची धुरा माझ्याकडे सोपविली. या माझ्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीला आज दोन वर्ष पूर्ण झाली. या दोन वर्षात राबविलेल्या सभासदहिताच्या विविध योजना, प्रभावी कामकाज, संचालक मंडळाचा काटकसरीचा कारभार यासंबंधी मांडणी करणे गरजेचे आहे. आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील ,आघाडीचे सर्व नेते यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व माझ्या सर्व सहकारी संचालक यांनी दिलेल्या बहुमोल सहकार्याने तसेच दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, कर्मचारी व प्रसिद्धी माध्यमे यांच्या योगदानाने ‘गोकुळ’ ची दिमाखात वाटचाल सुरु आहे याचा मला मनस्वी आनंद आहे.
“दोन वर्षाच्या कालावधी मध्ये संघाची वार्षिक उलाढाल २५५० कोटी वरून ३४२० कोटी रुपये इतकी झाली. यामध्ये ८७० कोटी रुपयांची वाढ झाली. दोन वर्षाच्या कालावधीत दूध उत्पाकांना दूध खरेदी सात वेळा वाढ दिली. यामध्ये म्हैस दुधासाठी १० रुपये व गाय दुधासाठी ११ रुपये दरवाढ आहे. म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम राबिवण्यात आला आहे. म्हैस खरेदीसाठी दूध संघ, केडीसीसी बँक व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्यामार्फत अनुदान योजना सुरू केली आहे.
“मुंबई वाशी शाखा विस्तारीकरण, नवीन पेट्रोल पंपास मान्यता, सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी मेडिकल ग्रेड ऑक्सीजन प्लॅन्ट सुरू केला• भारतीय नौदल सेना (नेव्ही) कारवार यांना टेट्रापॅक दुधाचा पुरवठा, ग्राहकांच्या मागणीनुसार गोकुळ बासुंदी, सुगंधीत दूध(फ्लेवर मिल्क) हे स्ट्रॉबेरी, पिस्ता, व्हेनीला व चॉकलेट या चार प्रकारांमध्ये उत्पादित केलेले आहे, तसेच नॉर्मल टेंपरेचरला १८० दिवस टिकून राहणारे नवीन टेट्रापॅक मधील मँगो,व्हेनिला लस्सी व मसाला ताक ग्राहकांच्या सेवेत दाखल केले आहे. हे नवीन उत्पादन चालू केले आहे.’असे पाटील यांनी सांगितले. बायोगॅस प्लॉन्ट, स्लरी प्रक्रिया प्रकल्प, गोकुळ मिल्क ई सुविधा अशा विविध सुविधा, नवनवीन योजना सुरू झाल्या याचे मनस्वी समाधान वाटत असे पाटील यांनी सांगितले.