यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करा : राजेश क्षीरसागर
schedule11 Sep 23 person by visibility 420 categoryमहानगरपालिका

शिवाजी पेठ "रायगड" शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
महाराष्ट्र न्यूज वन : हिंदुत्वाच्या विचारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले महायुतीचे राज्य सरकार हिंदुत्वाबाबत सकारात्मक निर्णय घेत आहे. गेल्या दोन वर्षात गणेशोत्सव, दहीहंडी सणांवर लावलेले निर्बंध गतवर्षी पासून उठविले. तालीम संस्था, मंडळांनी यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करावा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. ते शिवाजी पेठ येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
गेली ३७ वर्षे अखंडितपणे शिवसेनेचा भगवा निष्ठेने खांद्यावर घेतलेले शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे यांच्या "राजगड" शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन क्षीरसागर व जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या हस्ते पार पडले.उद्घाटन समारंभप्रसंगी युगपुरुषाचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळोखे, समन्वयक पुजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, युवती सेना अध्यक्षा नम्रता भोसले, उपशहरप्रमुख योगेश चौगले, रुपेश इंगवले, कपिल सरनाईक, सचिन राऊत, युवासेनेचे पियुष चव्हाण, शैलेश साळोखे, मंदार पाटील, शुभम शिंदे उपस्थित होते.