ह्रदयविकारतज्ज्ञ डाॅ.डी जी शितोळे यांचा सत्कार
schedule24 Sep 23 person by visibility 332 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील शाश्वत प्रतिष्ठान,समर्थ कृपा फेडरेशन,राजारामपुरी जिम्नॅशियम मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ह्रदयविकार जागरूकता दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ ह्रदयविकारतज्ज्ञ डाॅ डी. जी. शितोळे यांचा रेशन व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डाॅ .रवींद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
शाल ,श्रीफळ पुस्तक व पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरुप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाश्वत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ.गुरुदत्त म्हाडगुत होते. यावेळी ह्रदयविकार जागरूकता विषयांवर मार्गदर्शन करताना डाॅ शितोळे यांनी मानवी जीवन यांत्रिकी झाल्याने त्याचा थेट परिणाम आरोग्य बिघडण्यावर होत आहे.
ह्रदयाची काळजी घेण्याकरीता मानवाने आपल्या आवडीचे मैदानी खेळ, छंद जोपासावेत असे प्रतिपादन केले. यावेळी जनता बाजारचे संचालक दिपक शिराळे,सिपिआर दक्षता समिती सदस्य हिदायत मणेर, गणेश सकट, अरुण शिंदे, सिकंदर सोनुले, अॅड सचिन आवळे, जयराज म्हाडगुत, बापू धनवडे, हेमंत कवाळे, सुनिल दावणे, शाबीर मुल्ला उपस्थित होते.