दिल्लीतील सौंदर्य विषयक परिषदेत डॉ. उद्धव पाटील यांचे मार्गदर्शन
schedule07 Oct 26 person by visibility 6 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गुरुग्राम, दिल्ली एन सी आर येथील सौंदर्यवृद्धी विषयक परिषदेत ‘लेसरने चेहरा चिरतरुण ठेवणे’ यावर डॅा. उद्धव पाटील यांचे व्याख्यान झाले.
एस्थेटिक अलाएंन्स अॅकॅडेमी ग्लोबल इंस्टिट्यूट यांच्या वतीने भरविलेल्या या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेत आरोग्यपुर्ण वार्धक्यापासुन त्वचेचे सौंदर्य ते रिव्हर्सल अॅाफ एजिंग अशा अनेक विषयांवर व्याख्याने आणी चर्चासत्रे झाली. लेसर वापराविषयीची क्यु स्विच्, सीओटु, डायोड, फायबर ग्लास लेसर्स तसेच आयपीएल् आणी आर एफ् अशी विविध लेसर्स प्रत्यक्ष रुग्णांवर वापरुन त्यांचे फायदे-तोटे डॅा. पाटील यांनी विशद केले. देशभरातील २८० प्लास्टिक सर्जन्स आणी स्किन स्पेशालिस्टनी सहभाग घेतला. परिषदेच्या सह चेअरवूमन डॅा. सीमा ओबेरॉय-लाल यांच्या हस्ते डॅां उद्धव पाटील यांचा सत्कार झाला.