Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नगरसेवक हमरीतुमरीवर, प्रशासनाचा मोठा निर्णय ! महापालिकेची गुरुवारची सर्वसाधारण सभा होणार पोलिस बंदोबस्तात ! !ज्ञानपीठ विजेते लेखक वि.स. खांडेकर हे मानवी जीवनाचे भाष्यकार, त्यांच्या साहित्याची प्रासंगिकता काळाच्या पुढे - डाॅ. भालचंद्र मुणगेकरखाजगी प्राथमिक शिक्षक सेवक  पतसंस्थेच्या चेअरमनपदी रोहिणी येडगे, व्हाइस चेअरमनपदी चेअरमनपदी शिवाजी सोनाळकर कोल्हापुरात मंत्र्यांच्या समर्थकांची अधिकाऱ्यांवर दमबाजी ! कार्यालय पेटवण्याची, बुटाने मारण्याची धमकी ! !डी वाय पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकारकार्यालयात नगरसेवकांची भांडणे, चौकात कार्यकर्ते आमनेसामने! महापालिकेचा बनतोय आखाडा, पदाधिकारी म्हणतात हा कौटुंबिक वाद !!आयुक्तांच्या कार्यालयातच शारंगधर देशमुख - आदिल फरास एकमेकांना भिडले !  चौकात कार्यकर्ते जमले, पोलिसांचा हस्तक्षेप- नेत्यांची फोनाफोनी!!शिक्षक मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मला मिळेल, रविवारी प्रचाराचा शुभारंभ करणार - मंगेश चिवटेशिक्षक आमदार - जयंत आसगावकरांच्यासमोर आव्हान, महायुतीत रस्सीखेच! माजी आमदारही शर्यतीत !पोलिस प्रमुखांचे गणेश मंडळांना आवाहन ! उत्सवात लेझरचा वापर नको - आवाजाची मर्यादा पाळा!!

जाहिरात

 

नगरसेवक हमरीतुमरीवर, प्रशासनाचा मोठा निर्णय ! महापालिकेची गुरुवारची सर्वसाधारण सभा होणार पोलिस बंदोबस्तात ! !

schedule02 Sep 26 person by visibility 47 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  :  वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख व राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास यांच्यातील हमरीतुमरी आणि त्यानंतर महापालिका चौकात निर्माण झालेला तणाव या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गुरुवारी, ३ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी खबरदारी घेतली आहे. सर्वसाधारण सभेसाठी महापालिका प्रशासनाने विशेष पोलिस बंदोबस्त मागविला आहे.दुपारी एक वाजता सभा होणार आहे.

सभेच्या प्रारंभापासून सभा समाप्त होईपर्यंत महापालिका मुख्यालय, सभागृह परिसर व प्रवेशद्वार येथे पोलिस बंदोबस्त असणार आहे. तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात असे पत्रच महापालिका प्रशासनाने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याला दिले आहे. महापालिका परिसरातील अलीकडील घडामोडी, निर्माण झालेले वादाचे प्रसंग या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, कोणताही अनुचित प्रकार घडू न देणे, सभा सुरळीतपणे पार पाडावी यासाठी पोलिस बंदोबस्त  उपलब्ध करुन द्यावा असे पत्रात म्हटले आहे. तसेच यापुढे होणाऱ्या स्थायी समिती सभा, विशेष सभा व सर्वसाधारण सभा सुरळीत पार पडावी म्हणून बारा अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे.सहायक आयुक् संजय सरनाईक, विजय पाटील हे मतमोजणी अधिकारी तर कामगार अधिकारी राम काटकर, अधीक्षक अशोक यादव हे सहायक मतमोजणी अधिकारी असतील.

 सभेचे व्हिडिओ चित्रीकरण, छायाचित्रण व प्रसिद्धिीच्या अनुषंगाने जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी यांच्याकडे जबाबदारी आहे.संगणकीय मतदान प्रणाली व तांत्रिक व्यवस्था सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपूत हे सांभाळतील.सभागृहातील विद्युत व्यवस्था विद्युत अभियंता नारायण पुजारी, मतदान साहित्य व अभिलेख व्यवस्थेची जबाबदारी प्रभारी सहायक अधीक्षक विजय पाटील यांच्याकडे आहे.सभागृहातील स्वच्छतेचे नियोजन उपशहर अभियंता सुरेश पाटील, इमारत परिसरातील स्वच्छता व्यवस्था  मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार तर महापालिका मुख्य इमारत परिसरात सुशोभित झाडांच्या कुंडया ठेवणे, सत्कारासाठी रोपे उपलब्धतेची जबाबदारी उद्यान अधीक्षक समीर व्यांघ्राबरे यांच्याकडे सोपविली आहे.महापालिका प्रशासनाने बुधवारी, दोन सप्टेंबर रोजी आदेश काढले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes