Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात मंत्र्यांच्या समर्थकांची अधिकाऱ्यांवर दमबाजी ! कार्यालय पेटवण्याची, बुटाने मारण्याची धमकी ! !डी वाय पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकारकार्यालयात नगरसेवकांची भांडणे, चौकात कार्यकर्ते आमनेसामने! महापालिकेचा बनतोय आखाडा, पदाधिकारी म्हणतात हा कौटुंबिक वाद !!आयुक्तांच्या कार्यालयातच शारंगधर देशमुख - आदिल फरास एकमेकांना भिडले !  चौकात कार्यकर्ते जमले, पोलिसांचा हस्तक्षेप- नेत्यांची फोनाफोनी!!शिक्षक मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मला मिळेल, रविवारी प्रचाराचा शुभारंभ करणार - मंगेश चिवटेशिक्षक आमदार - जयंत आसगावकरांच्यासमोर आव्हान, महायुतीत रस्सीखेच! माजी आमदारही शर्यतीत !पोलिस प्रमुखांचे गणेश मंडळांना आवाहन ! उत्सवात लेझरचा वापर नको - आवाजाची मर्यादा पाळा!!७८९ दूध संस्था अपात्र, कागल – करवीर -राधानगरीतील संस्थांचा समावेश! दूध संस्था प्रतिनिधीची अधिकाऱ्यांना उद्देशून एकेरी भाषा !!कोल्हापूर शहर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर, शहर अध्यक्षपदी प्रा. अमरसिंह शेळकेदूरशिक्षण -ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

जाहिरात

 

कोल्हापुरात मंत्र्यांच्या समर्थकांची अधिकाऱ्यांवर दमबाजी ! कार्यालय पेटवण्याची, बुटाने मारण्याची धमकी ! !

schedule02 Sep 26 person by visibility 4 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या प्रारुप मतदार यादीतील ७८९ संस्था अपात्र ठरले. विभागीय सहनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी नारायण परजणे यांनी यासंदर्भातील निकाल सोमवारी दिला. या निकालानंतर दूध संस्था प्रतिनिधींनी दुग्ध विकास विभाग कार्यालयात जोरदार हंगामा केला. मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक असलेले व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विकास पाटील कुरुकलीकर यांनी दूध संस्था अपात्र ठरविण्यावरु जाब विचारताना अधिकाऱ्यांवर दमबाजी केली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माने यांचे तर अधिकाऱ्यांशी बोलताना भान हरपले. त्यांनी, अधिकाऱ्यांना उद्देशून एकेरी भाषा वापरली. ‘मस्ती आली  काय रे? बुटाने मारेन, तुला सोडत नाही.’या भाषेत अधिकाऱ्यांना धमकाविण्याचा प्रकार केला. विभागीय उपनिबंधक हे सायंकाळी साडे पाच नंतर कार्यालयात दाखल झाले. त्यावरुनही दूध संस्था प्रतिनिधींचा पारा चढला होता यावरुन अधिकाऱ्यांना जाब विचारला. विकास पाटील कुरुकलीकर यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून, ‘दिवसभर कुठे होता ? किती पैशांनी मॅनेंज झाला ? खासगी व्यक्तीच्या कार्यालयात बसून निकाल तयार केला आहे,’ असा प्रश्नांचा भडीमार केला.

विभागीय सहनिबंधकांनी दिलेल्या निर्णयात कागल, करवीर आणि राधानगरी तालुक्यातील संस्था मोठ्या संख्येने अपात्र ठरल्या आहेत. यामुळे संतप्त झालेल्या दूध संस्था प्रतिनिधींनी, अधिकाऱ्यांना लक्ष्य केले. अधिकाऱ्यांसमोर कागदपत्रे मांडत सांगा दूध संस्था कशा अपात्र ठरविल्या असा प्रश्न केला. ‘दिवसभर कोणाच्या कार्यालयात बसून होता, न्यायालयापेक्षा तुम्ही मोठे झाला का?’असा सवाल करताना दूध संस्था प्रतिनिधींचा आवाज वाढला. दूध संस्था प्रतिनिधींनी,‘संस्था अपात्र ठरविण्यासाठी किती पैसे मिळाले पगारात भागत नाही काय तुम्हाला, तुम्हे याद रखेंगे ’असा इशाराही काहींनी दिला. तसेच ‘रॉकेल आणा रे, कार्यालय पेटवून टाकू या’अशी भाषा काहींनी वापरली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes