Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आयुक्तांच्या कार्यालयातच शारंगधर देशमुख - आदिल फरास एकमेकांना भिडले !  चौकात कार्यकर्ते जमले, पोलिसांचा हस्तक्षेप- नेत्यांची फोनाफोनी!!शिक्षक मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मला मिळेल, रविवारी प्रचाराचा शुभारंभ करणार - मंगेश चिवटेशिक्षक आमदार - जयंत आसगावकरांच्यासमोर आव्हान, महायुतीत रस्सीखेच! माजी आमदारही शर्यतीत !पोलिस प्रमुखांचे गणेश मंडळांना आवाहन ! उत्सवात लेझरचा वापर नको - आवाजाची मर्यादा पाळा!!७८९ दूध संस्था अपात्र, कागल – करवीर -राधानगरीतील संस्थांचा समावेश! दूध संस्था प्रतिनिधीची अधिकाऱ्यांना उद्देशून एकेरी भाषा !!कोल्हापूर शहर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर, शहर अध्यक्षपदी प्रा. अमरसिंह शेळकेदूरशिक्षण -ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळाकुपोषित बालकांना जिल्हा परिषद दत्तक घेणार, महिला व बालकल्याण समितीत निर्णयडीवाय पाटील अभियांत्रिकीला  क्यूएस आय- गेज गोल्ड मानांकनसिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा गुरुवारी लोकार्पण सोहळा,  पंकजा मुंडेंची उपस्थिती

जाहिरात

 

शिक्षक मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मला मिळेल, रविवारी प्रचाराचा शुभारंभ करणार - मंगेश चिवटे

schedule01 Sep 26 person by visibility 35 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : पुणे शिक्षक मतदार संघातून महायुतीकडून  उमेदवारी मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे. महायुतीचे नेते मंडळी माझ्या विश्वास दाखवतील दरम्यान कोल्हापुरात 6 सप्टेंबर 20 26 रोजी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेतर्फे राज्यस्तरीय आदर्श संस्था, आदर्श शाळा व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाद्वारे शिक्षक मतदारसंघातील माझ्या उमेदवारीच्या प्रचाराचा नारळ फुटेल असे पुणे शिक्षक मतदार संघातील इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांनी सांगितले. मार्केट यार्ड परिसरातील लोटस हॉल येथे रविवारी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थित हा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे असे चिवटे यांनी सांगितले.
 चिवटे हे  शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. ते पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत.' शिक्षकांच्या प्रश्नांची मला जाण आहे. त्यांच्या विविध विषयांची सोडवणूक करण्यासाठी मी सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा केला आहे. मी एमएबीएड आहे. काही महिने शिक्षक म्हणूनही काम केले आहे असे त्यांनी सांगितले. जुनी पेन्शन योजना, संचमान्यतील त्रुटी , टप्पा अनुदान वाढ अशा विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढविण्यासच्या अनुषंगाने मी तयारी करत आहे. महायुतीच्या नेतेमंडळीची  भेट घेऊन त्यांना या संदर्भातील माहिती दिली आहे. गेली अनेक वर्ष शिक्षकांचे प्रश्न सुटले नाहीत यावरून सध्याच्या शिक्षक आमदारांच्या कामाची पद्धत दिसून येते असा टोलाही त्यांनी काँग्रेसचे आमदार जयंत आसगावकर यांना लगावला. विविध शिक्षण संघटना, संस्थाचालक यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी पाठिंबा दिला आहे योग्य वेळी ते आपण निर्णय जाहीर करणार आहेत असेही चिवटे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेवेळी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. बापूसाहेब अडसूळ, वैभव शेटे,  मिलिंद सनदी,  उमेश कल्याणी,  नितीन पाटील, प्रशांत साळुंखे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes