खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी रोहिणी येडगे, व्हाइस चेअरमनपदी चेअरमनपदी शिवाजी सोनाळकर
schedule02 Sep 26 person by visibility 18 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी रोहिणी येडगे, व्हाईस चेअरमनपदी शिवाजी सोनाळकर यांची बिनविरोध निवड झाली. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ सभेत या निवडी पार पडल्या.सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी म्हणून महेश शेलार होते. संस्थापक भरत रसाळे यांच्या प्रमुख उपस्थितत या निवडी पार पडल्या.
चेअरमनपदासाठी येडगे यांचे नाव संचालक वर्षाराणी वायदंडे यांनी सुचविले त्यास संचालक कृष्णात चौगले यांनी अनुमोदन दिले. तर व्हाईस चेअरमनपदासाठी सोनाळकर यांचे नाव संचालक सताप्पा कासार यांनी सुचविले तर अरुण गोते यांनी अनुमोदन दिले.
संस्थापक भरत रसाळे म्हणाले की संस्था उत्तरोतर प्रगतीपथावर आहे. असाच संस्थेचा चढता आलेख नूतन चेअरमन व्हाइस चेअरमन ठेवतील असा विश्वास व्यक्त केला. सुरवातीपासूनच संस्थेचा कारभार पारदर्शी व काटकसरीचा सुरू आहे. नूतन चेअरमन येडगे म्हणाल्या की संस्थेचा कारभार संस्थेचे संस्थापक आदरणीय भरत रसाळे यांच्या मार्गदर्शनानुसारच होणार आहे मला दिलेल्या संधीचा मी संस्थेच्या उत्कर्षासाठीच प्रयत्न करणार आहे*
यावेळी व्हाईस चेअरमन सोनाळकर, माजी चेअरमन साताप्पा कासार, संचालक मच्छिंद्र नाळे, वर्षाराणी वायदंडे,संतोष आयरे यांनी मनोगत व्यक्त केली. माजी व्हाईस चेअरमन अमित परीट यांनी आभार मानले.यावेळी संचालक सर्जेराव नाईक, राजेश कोंडेकर, राजेंद्र कोरे, संदीप सातपुते,विनोद घुले, कार्यकारी संचालक - सदाशिव साळवी उपस्थित होते.