Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण यरशिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शाहू मानेंचा केआयटीत सत्कारसतेज पाटलांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नगरसेवकांचे प्रीतीभोजन, खुलेपणाने रंगली राजकारणावर चर्चा !किसनराव मोरे ट्रस्टतर्फे पुरस्कार जाहीर, बुधवारी पुरस्कार वितरण समारंभकोल्हापूर उद्यम  सोसायटीच्या अध्यक्षपदी जयश्री जाधव, उपाध्यक्षपदी सुधाकर सुतारकोल्हापुरातून सात शहरांशी थेट विमानसेवा, मुंबई-अहमदाबाचे विमान आता ७६ आसनी !वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस ऑगस्टपासून कोल्हापुरात धावणार, स्वातंत्र्यदिनी चार्जिंग स्टेशनचा शुभारंभकैलास मानसरोवर यात्रेसंबंधी सहज सेवा ट्रस्टतर्फे मोफत मार्गदर्शनमहापूर नियंत्रणाच्या उपाययोजनेसंबंधी सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाची चर्चाप्रा. संदीप पाटील यांना पीएचडी

जाहिरात

 

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय केंद्राचे डिसेंबरात भूमिपूजन : हसन मुश्रीफ

schedule16 Oct 23 person by visibility 365 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन ्प्रतिनिधी, कोल्हापूर : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्या हस्ते शेंडा पार्कच्या १,१०० बेडच्या हॉस्पिटलच्या भूमिपूजन होणार आहे. याप्रसंगी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय केंद्राचे भूमिपूजनही करू’ अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय केंद्राच्या उद्घाटन समारंभात मंत्री श्री. मुश्रीफ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
मुश्रीफ म्हणाले, ‘ कोल्हापुरात होत असलेल्या विभागीय केंद्रामुळे कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना तत्पर सेवा- सुविधा मिळतील. हे विभागीय केंद्र सर्व सुविधायुक्त आणि सुसज्ज होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू.*
  कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर म्हणाल्या, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ताब्यातील तीन एकर जागा या विभागीय केंद्रासाठी दिली. त्यांच्या गतिमान कार्यपद्धतीमुळेच अल्पावधीतच हे विभागीय केंद्र साकारत आहे. त्यांनी स्वतः मनावर घेतल्यामुळेच नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे पूर्ण क्षमतेचे विभागीय केंद्र इतक्या तत्परतेने कोल्हापुरात साकारत आहे. यामुळे या चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचा त्रास कमी होणार आहे.
व्यासपीठावर प्रकुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, वित्त व लेखा अधिकारी नरहरी कळसकर, उप कुलसचिव तथा समन्वयक महेंद्र कोठावदे, विभागीय केंद्र समन्वयक डाॅ. राजकुमार पाटील, राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. प्रकाश गुरव आदी प्रमुख उपस्थित होते.  उपपुलसचिव तथा समन्वयक महेंद्र कोठावदे यांनी स्वागत केले.  डॉ. सुनिता शिराळे यांनी सूत्रसंचालन केले. विभागीय केंद्र समन्वयक डाॅ. राजकुमार पाटील यांनी आभार मानले.
............................          
अवयव दानासाठी जागृती हवी......!
 मुश्रीफ म्हणाले, मी डॉक्टर नाही परंतु; वैद्यकीय क्षेत्रात मनापासून काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. मरणोत्तर अवयव दान तसेच अपघात, आघात यामुळे मेंदूमृत रुग्णांकडून अवयव दान झाल्यास अनेक जणांना नवजीवन मिळेल. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून या विषयावर महाराष्ट्रभर प्रबोधन व्हावे, ही माझी अपेक्षा आहे.*                    
*
........................
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes