नन नन
schedule21 Sep 26 person by visibility 10 categoryराजकीय
गोकुळसाठी भाजपचे शक्ती प्रदर्शन, २५ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल! सहा माजी संचालकांचे अर्ज, नेतेमंडळीची उपस्थिती ! !
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने सोमवारी, (२१ सप्टेंबर २०२६) शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. गोकुळच्या संचालकपदाच्या २५ जागेसाठी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज भरले आहेत. नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयापासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलपर्यंत शक्तीप्रदर्शन करण्यात आले.निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.
उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक, चेतन नरके, अंबरिश घाटगे, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, अशोक चराटी, गडहिंग्लजच्या माजी नराध्यक्ष स्वाती कोरी, प्रताप पाटील कावणेकर, सुहासिनी प्रवीणसिंह पाटील, नाथाजी पाटील, पदमजा आपटे, रघु पाटील चिखलीकर यांचा समावेश आहे. शिरोळ तालुक्यातील दत्तवाडीतील बाबासो आण्णासू पाटील, बुबनाळे येथील अजित शहापुरे , शिरोळ येथील आप्पा गावडे आणि कवठेगुलंद येथील मल्लाप्पा चौगुले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले भाजपने स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी महायुती म्हणूनच निवडणूक लढविली जाईल असे यापूर्वीच नेतेमंडळींनी स्पष्ट केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी कोल्हापुरात भाजप नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत सोमवारी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरले होते. त्यानुसार भाजपतर्फे गोकुळसाठी २५ उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली.
सकाळी १०.३० वाजता भाजपाचे नेते, इच्छुक उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते हे भाजप कार्यालयातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बाहेर पडले. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भरमूअण्णा पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, संजय घाटगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन पी जी शिंदे, प्रा. जयंत पाटील, महिला आघाडीच्या स्वाती पाटील, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती सावकार मादनाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, नाथाजी पाटील, भूषण पाटील, भगवान काटे उपस्थित होते.