Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना पितृशोकडॉ विलास व्ही. कारजिन्नी यांना सीनियर इंजिनिअर ऑनर २०२६ पुरस्कारलिपिकाकडून मुख्याध्यापकांना अपमानास्पद वागणूकराज कोरगावकर, अश्किन आजरेकरचे मुंबईतील स्पर्धेत यशजर्मनीतील प्लांटिक्स कंपनीच्या प्रतिनिधीची बाजार समितीला भेटमृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना अभिवादनमी मंडळे तोडणारा नव्हे तर जोडणारा कार्यकर्ता –आमदार राजेश क्षीरसागरपाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम; महिन्यात ५३ लाखाची वसुली ! ६५ नळ कनेक्शन बंद; ६ अनधिकृत कनेक्शनला ब्रेक !!आयएसटीई नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी डॉ.महादेव नरके गोकुळच्या राजकारणात शिवसेना ‘मधला भाऊ’! करवीरमध्ये विश्वास पाटील व आमच्याकडे ७७५ ठराव! !

जाहिरात

 

शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना पितृशोक

schedule19 Sep 26 person by visibility 59 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी.   शिक्षण आयुक्तालय पुणे येथील कार्यालयातील शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले  यांचे वडील  राजाराम महादेव चौगुले यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी (18 सप्टेंबर 2026)  निधन झाले. मृत्यूसमयी ते  81 वर्षाचे होते.  राजाराम चौगुले यांनी शेतकरी संघामध्ये जवळपास 31 वर्षे सेवा बजावली होती. मॅनेजरपदाची धुरा अतिशय समर्थपणे सांभाळली होती. मुळात शिस्तप्रिय असणारे चौगुले यांनी त्यांच्या नोकरीच्या कार्यकालामध्ये शेतकरी संघासाठी योगदान दिले. चौगुले यांच्या पश्चात त्यांचे जेष्ठ चिरंजीव  सुभाष चौगुले, शिवाजी विद्यापीठातील कर्मचारी प्रकाश चौगुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी कागल तालुक्यातील मळगे खुर्द येथे मूळ गावी करण्यात आला.रक्षाविसर्जन विधी रविवार 20 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी नऊ वाजता  आहे .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes