Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लिपिकाकडून मुख्याध्यापकांना अपमानास्पद वागणूकराज कोरगावकर, अश्किन आजरेकरचे मुंबईतील स्पर्धेत यशजर्मनीतील प्लांटिक्स कंपनीच्या प्रतिनिधीची बाजार समितीला भेटमृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना अभिवादनमी मंडळे तोडणारा नव्हे तर जोडणारा कार्यकर्ता –आमदार राजेश क्षीरसागरपाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम; महिन्यात ५३ लाखाची वसुली ! ६५ नळ कनेक्शन बंद; ६ अनधिकृत कनेक्शनला ब्रेक !!आयएसटीई नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी डॉ.महादेव नरके गोकुळच्या राजकारणात शिवसेना ‘मधला भाऊ’! करवीरमध्ये विश्वास पाटील व आमच्याकडे ७७५ ठराव! !सेवा संकल्प अंतर्गत अधिकाऱ्यांचा स्वच्छता अभियानात सहभागपरदेशातील विद्यार्थिनी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी वारणा विद्यापीठात

जाहिरात

 

लिपिकाकडून मुख्याध्यापकांना अपमानास्पद वागणूक

schedule19 Sep 26 person by visibility 25 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनधी -: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक नितीन खाडे यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार शाहूवाडी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सावेचे प्रभारी मुख्याध्यापक बाबासाहेब कदम यांनी केली आहे. तर लिपिक खाडे यांनी, ‘माझा आवाज मोठा आहे, त्यामुळे तक्रारदारांचा गैरसमज झाला असावा.’असे स्पष्टीकरण दिले. प्रभारी मुख्याध्यापक कदम व त्यांचे सहकारी २१  ऑगस्टला कामासाठी शिक्षण विभागात आले होते.त्यावेळी लिपिक खाडे यांनी, अरेरावी केली, तसेच एकेरी भाषेचा वापर केला असे कदम यांनी म्हटले आहे. ‘तुम्हाला वाचता येते का, का आलायस, सरळ उभा राहा’अशी अपमानास्पद वागणूक दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्रभारी मुख्याध्यापक कदम यांनी या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. यासंबंधीचे निवेदन आमदार जयंत आसगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्याकडे केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes