Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहातगोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना पितृशोकडॉ विलास व्ही. कारजिन्नी यांना सीनियर इंजिनिअर ऑनर २०२६ पुरस्कारलिपिकाकडून मुख्याध्यापकांना अपमानास्पद वागणूकराज कोरगावकर, अश्किन आजरेकरचे मुंबईतील स्पर्धेत यशजर्मनीतील प्लांटिक्स कंपनीच्या प्रतिनिधीची बाजार समितीला भेटमृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना अभिवादनमी मंडळे तोडणारा नव्हे तर जोडणारा कार्यकर्ता –आमदार राजेश क्षीरसागरपाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम; महिन्यात ५३ लाखाची वसुली ! ६५ नळ कनेक्शन बंद; ६ अनधिकृत कनेक्शनला ब्रेक !!

जाहिरात

 

केआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहात

schedule20 Sep 26 person by visibility 21 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : " विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात येणाऱ्या आव्हानांकडे एक संधी म्हणून पाहावे. सकारात्मक दृष्टिकोन आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावरच यशाचे उत्तुंग शिखर गाठता येते," असे प्रतिपादन केआयटी आयएमईआरचे  विश्वस्त संचालक  सुनील कुलकर्णी यांनी केले.
केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (प्रदत्त स्वायत्त), कोल्हापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘इंडक्शन प्रोग्राम’च्या उद्घाटन सोहळ्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कॉलेजच्या सेंट्रल सेमिनार हॉलमध्ये हा सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.
 केआयटीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी म्हणाले, "केआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रयोगशाळा आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या सुविधांचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा."
या इंडक्शन प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन होते. प्रामुख्याने करिअर आणि तांत्रिक शिक्षणातील आवश्यक कौशल्ये, परीक्षा व मूल्यमापन पद्धती, महाविद्यालयातील विविध स्टुडंट क्लब्स, तसेच नवोदित उमेदवारांकडून उद्योग क्षेत्राच्या असणाऱ्या अपेक्षा याविषयी सविस्तर माहितीचा समावेश असतो. तसेच प्रोजेक्ट-बेस्ड लर्निंग आणि शैक्षणिक प्रकल्प, एनसीसी व शौर्य उपक्रम, परदेशी भाषांचे महत्त्व, आर्थिक साक्षरता, शिष्यवृत्ती योजनांविषयी जनजागृती, व्यावसायिकता आणि यश, पदवीच्या पलीकडे उपलब्ध असणाऱ्या प्लेसमेंट, उच्च शिक्षण आणि उद्योजकतेच्या संधी, सर्जनशील कला, पर्यावरण जागृतीविषयी मार्गदर्शन केले जाते. पोलीस विभागाच्या वतीने सायबर सुरक्षा, सायबर गुन्हे आणि अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
प्रथम वर्ष विभागाचे प्रमुख डॉ. ए. एम. कुरेशी यांनी स्वागत केले प्रा. क्षितिजा ताशी यांनी प्रास्ताविक केले. अधिष्ठाता डॉ. जितेंद्र भाट उपस्थित होते.या इंडक्शन प्रोग्राम साठी संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रा.मिनाज शिकलगार यांनी आभार मानले
.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes