भाजप-महाडिक परिवारकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात ! ५० लाखांचे साहित्य घेऊन ट्रक रवाना !!
schedule30 Sep 25 person by visibility 236 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘एक हात मदतीचा’ या भावनेने भारतीय जनता पक्ष व खासदार धनंजय महाडिक यांच्यातर्फे सोलापूरसह मराठवाडयातील पूरग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू पाठविल्या. सुमारे ५० लाख रूपये खर्चून मानवतेच्या भावनेतून जीवनावश्यक वस्तूंचे किट घेऊन ट्रक रवाना झाले. भाजप आणि महाडिक परिवाराने हा उपक्रम हाती घेतला आहे.
पुरग्रस्तांना उपयोगी ठरेल असे दैनंदिन वापराच्या वस्तूंचे कीट बनवण्यात आले आहे. त्यामध्ये गहू, तांदूळ, तेल, कडधान्य, चटणी, मीठ, टूथपेस्ट, ब्रश, विविध प्रकारचे मसाले, साबण, ब्लँकेट, औषध - गोळ्या असे साहित्य आहे. मराठवाड्यातील सुमारे दीड हजार नागरिकांसाठी ही कीट आज कोल्हापुरातून रवाना झाली. आमदार अमल महाडिक, भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक,भाजपचे महेश जाधव, विजय जाधव, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, प्रदीप उलपे, राजसिंह शेळके, भगवानराव काटे, विजयसिंह खाडे, भैय्या शेटके, संग्राम निकम, संजय निकम, विलास वास्कर, मारुती माने, चंद्रकांत घाटगे, महेश वासुदेव, माजी नगरसेविका स्मिता माने, रूपाराणी निकम, उमा इंगळे, भाग्यश्री शेटके उपस्थित होते.
दोन ट्रक मधून, मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांना हे साहित्य पाठवण्यात आले. पुढील टप्प्यात चादर, ब्लँकेट, जाजम, कपडे यासह जनावरांसाठी चारा पाठवण्याचे नियोजन आहे. तसेच राज्य सरकारच्या पातळीवरून पुरग्रस्तांना मदत दिली जाईल, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजू मोरे, भरत काळे, सदानंद राजवर्धन, हंबीरराव पाटील, नामदेव पाटील, प्रकाश पाटील, संदीप कुंभार, विशाल शिराळकर, सुधीर राणे, रहीम सनदी, शैलेश पाटील उपस्थित होते.