Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महात्मा बसवण्णांच्या वचनात मराठीतील प्रबोधन परंपरेचे मूळ – प्राचार्य राजेखान शानेदिवाणशिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शाहू मानेंचा केआयटीत सत्कारसतेज पाटलांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नगरसेवकांचे प्रीतीभोजन, खुलेपणाने रंगली राजकारणावर चर्चा !किसनराव मोरे ट्रस्टतर्फे पुरस्कार जाहीर, बुधवारी पुरस्कार वितरण समारंभकोल्हापूर उद्यम  सोसायटीच्या अध्यक्षपदी जयश्री जाधव, उपाध्यक्षपदी सुधाकर सुतारकोल्हापुरातून सात शहरांशी थेट विमानसेवा, मुंबई-अहमदाबाचे विमान आता ७६ आसनी !वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस ऑगस्टपासून कोल्हापुरात धावणार, स्वातंत्र्यदिनी चार्जिंग स्टेशनचा शुभारंभकैलास मानसरोवर यात्रेसंबंधी सहज सेवा ट्रस्टतर्फे मोफत मार्गदर्शनमहापूर नियंत्रणाच्या उपाययोजनेसंबंधी सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाची चर्चाप्रा. संदीप पाटील यांना पीएचडी

जाहिरात

 

गोकुळच्या चेअरमनपदासाठी अरुण डोंगळेंचे नाव ! सतरा मे रोजी संचालकांची बैठक !!

schedule13 May 23 person by visibility 399 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या चेअरमन पदासाठी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या नावावर नेते मंडळाच्या बैठकीत शिक्कामार्फत झाले. विद्यमान चेअरमन विश्वास पाटील यांचा चेअरमनपदाचा दोन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर नूतन चेअरमनपद डोंगळे यांना देण्याचे ठरले. 17 मे रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत विद्यमान चेअरमन पाटील यांचा राजीनामा मंजूर केला जाईल असे समजते.
 दोन वर्षापूर्वी गोकुळची निवडणूक झाली होती या निवडणुकीत आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के पी पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके अशी आघाडी तयार झाली होती. गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे हे नव्या आघाडी सोबत राहिले. त्या निवडणुकीत गोकुळमधील तत्कालीन सत्ताधारी नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा पराभव झाला.
 गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर चेअरमनपदी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांना संधी मिळाली. पाटील यांच्याकडे दोन वर्ष तर त्यानंतर अरुण डोंगरे यांच्याकडे चेअरमन पद असे सूत्र ठरले होते. त्यानुसार चेअरमन विश्वास पाटील यांच्या चेअरमनपदाचा दोन वर्षाचा कालावधी या महिन्यात पूर्ण झाला. पूर्वी ठरल्यानुसार नव्या चेअरमन निवडीसाठी आघाडीचे नेतेमंडळी व संचालकांची शनिवारी (१३ मे ) कोल्हापूर परिसरात बैठक झाली.
आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, विनय कोरे, खासदार मंडलिक, माजी आमदार के पी पाटील यांच्यासह आघाडीचे अन्य नेते मंडळी व संचालक उपस्थित होते. चेअरमनपदाच्या अनुषंगाने चर्चा झाली. ठरल्यानुसार अरुण डोंगळे यांना चेअरमनपद देण्याविषयी एकमत झाले. 17 मे रोजी संचालकांची बैठक होणार आहे. या बैठकीत पाटलांचा राजीनामा मंजूर केला जाईल. तत्पूर्वी विद्यमान चेअरमन पाटील हे आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा मुख्य कार्यकारी संचालक यांच्याकडे देतील. मुख्य कार्यकारी संचालकमार्फत चेअरमनांचा राजीनामा मंजुरीचा विषय संचालकांच्या बैठकी समोर येईल. गेली दोन वर्ष चेअरमन म्हणून काम करताना विश्वास पाटील यांनी सगळ्या घटकांना सोबत घेऊन कामकाज करणारा प्राधान्य दिले. नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादकांना साधारणपणे दहा रुपयांची दूध दरवाढ दिली आहे. दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देणारा कामकाज करण्यावर पाटलांचा भर होता. जस्ट संचालक अरुण डोंगळे यांनाही गोकुळच्या कामकाजाचा प्रदेश अनुभव आहे. दुग्ध व्यवसायातील जाणकार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गेली अनेक वर्ष संचालक म्हणून ते गोकुळमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांना चेअरमन पदाचा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी या पदावर काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा संघाला व्हावा म्हणून त्यांच्याकडे पुन्हा एकदा गोकुळच्या चेअरमनपदाची धुरा सोपवण्याचे बैठकीत ठरले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes