+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर adjustचेतन नरके गटाचा शाहू छत्रपतींना पाठिंबा ! विरोधकांना जाहीरपणे तराटणी!! adjustसदाशिवराव मंडलिकांचे पांग फेडण्याची हीच योग्य वेळ-हसन मुश्रीफ adjustशिक्षक भारती संघटनेच्या उपाध्यक्षपदी काकासाहेब भोकरे
1000255522
Screenshot_20240226_195247~2
schedule13 Mar 24 person by visibility 132 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गाय दूध अनुदानात काम करणाऱ्या दूध संस्थांना सरकारमार्फत मोबदला मिळवण्यासाठी गोकुळने पाठपुरावा केलेबद्दल कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेतर्फे चेअरमन अरुण डोंगळे व संचालकांचा सत्कार करण्यात आला.कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील व पदाधिकाऱ्यांच्या  हस्ते गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे सत्काराचे आयोजन केले होते.
 चेअरमन डोंगळे म्हणाले, ‘गाय दूध अनुदान प्रकियेमध्ये प्राथमिक दूध संस्था महत्वाची भूमिका बजावत असून त्यांच्या प्रयत्नातून दूध उत्पादकांना हे थेट अनुदान मिळण्यास मदत होत आहे. दूध संस्था कर्मचारी यांनी संस्था पातळीवरील कामकाजामध्ये गतिशीलता आणून जास्तीत जास्त दूध उत्पादकांना अनुदान मिळवून देण्यास प्रयत्नशील राहावे.’
    अध्यक्ष केरबा पाटील म्हणाले, ‘ गोकुळने नेहमीच दूध उत्पादक, प्राथमिक दूध संस्था, संस्था कर्मचारी या सर्वाचे हित जपले असून दूध संस्था कर्मचारी संघटनेला गोकुळचे नेहमीच सहकार्य लाभले आहे. गाय दूध अनुदानात काम करणाऱ्या दूध संस्थांना शासनामार्फत मोबदला मिळवण्यासाठी गोकुळने यशस्वी पाठपुरावा केलेबद्दल गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ याचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी  गोकुळचे संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, शामराव पाटील,विश्वास पाटील, सुरेश जाधव उपस्थित होते.