Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
क्रिडाई कोल्हापूरतर्फे राष्ट्रीय अभियंता दिननृत्यांगना वर्षा  खाडिलकर, निधी आलासेंच्या नृत्याविष्काराने रसिक-प्रेक्षक मंत्रमुग्धगोकुळच्या निवडणुकीसाठी नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर,  बाळासाहेब खाडेंचे अर्ज दाखलमुश्रीफांनी जाहीर केलेल्या गोकुळच्या ठराव संख्येवरून भाजपच्या नेत्यांना मिरचीचा ठसका का लागला ? युवराज पाटील हसन मुश्रीफांचे भाजपला थेट चॅलेंज ! गोकुळसाठी कोल्हापुरात ठरावांची बेरीज, पदवीधर आमदारकीसाठी सांगलीत शड्डू !!जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?

जाहिरात

 

नृत्यांगना वर्षा  खाडिलकर, निधी आलासेंच्या नृत्याविष्काराने रसिक-प्रेक्षक मंत्रमुग्ध

schedule15 Sep 26 person by visibility 14 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित तीन दिवसीय कलाश्री संगीत महोत्सवाला मंगळवारी (पंधरा सप्टेंबर २०२६) सुरुवात झाली. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नृत्यांगणा वर्षा खाडिलकर व निधी आलासे यांच्या नृत्याविष्काराने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. राम गणेश गडकरी सभागृहात महोत्सव होत आहे.

महोत्सवाची सुरुवात संस्थेत बसवलेल्या श्री गणेशाच्या आरतीने करण्यात आली. यानंतर महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे विनोदकुमार लोहिया ,डॉ. सुरेश देशपांडे, डॉ. शितल धर्माधिकारी,  सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सहसचिव प्राचार्य  एस. एस. चव्हाण व मिलिंद  गुणे यांच्या हस्ते  करण्यात आले. यानंतर नृत्यांजली या कार्यक्रमांतर्गत सुप्रसिद्ध  कथक नृत्यांगना वर्षा  खाडिलकर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवात "विष्णू वंदनेने" केली.  यानंतर भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेतील  कथकच्या विविध   अंगाचे मनोहरी अविष्कार सादर केले. ताल, रुद्र, ठुमरी ,होरी  चतरंग आणि गणेश भजन अशा विविध रचना सादर केल्या.

 या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे "दि रिदम ऑफ रूपक" हा अनोखा नृत्य आविष्कार रूपक तालाच्या सात मात्रांवर आधारित भारतीय व पाश्चात्य वाद्य संगीताचा  सुंदर संगमाला  कथक  नृत्याची जोड  होय.  मृणाल वासकर व  शमिका भोसले यांनी होरी चतरंग हे नृत्य सादर केले.. वर्षा खाडिलकर यांना सह कलाकार म्हणून वसंता नृत्यांगण कला अकादमीच्या विद्यार्थिनींनी साथ संगत दिली. यानंतर सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना निधी आलासे  यांनी कार्यक्रमाची सुरुवात देवता ,गुरु आणि रसिकांना नमन करणाऱ्या "पुष्पांजली "  नृत्याने केली.  श्री गणेशाच्या स्वरूपाचे दर्शन घडवणारे "महागणपती" नृत्य व नटराज स्वरूपाला वंदन करणारे "नटेश  कौत्वम "  हे नृत्य  सादर केले. तसेच आदिशक्तीच्या तेजस्वी रूपाचे दर्शन घडवणारी "आंबा शांभवी " या रचना सादर केल्या. आलासे यांना सह कलाकार म्हणून तपस्यासिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यम सम्राटनगर शाखेच्या १४ विद्यार्थिनींनी साथ  दिली. या दोन्ही कार्यक्रमांना  निवेदक म्हणून सुप्रसिद्ध निवेदक मनीष आपटे यांनी निवेदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes