मुलींसाठी कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण शिबिर
schedule21 May 23 person by visibility 561 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई, यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर व कोल्हापूर मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ ते वीस वर्षे वयोगटातील ३०० मुलींना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर प्रतिबंध (CERVAVAC) ही उच्च दर्जाची लस मोफत देण्यात आली. गेल्या दोन महिन्यात या दोन वेळा लसीकरण शिबिर झाले.
गेल्या चार वर्षांमध्ये डायरेक्टर रिसर्च स्टडीज अँड ॲडिशनल प्रोजेक्ट कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन ऑफ इंडिया डॉ. धनंजया सारनाथ यांनी २२००० हून अधिक महाराष्ट्रातील मुलींना ही लस विविध शिबिरातून दिली आहे.
हिरकणी ग्रुप सातारा, रोटरी क्लब ऑफ गार्गीज कोल्हापूर, सनराईज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कॅन्सर प्रतिबंधक, अवयव दान जनजागृती करणारी वनिता सांस्कृतिक संस्था, हॉटेल पर्ल यांचे या शिबिरात विशेष योगदान लाभले.
यावेळी के एम ए अध्यक्ष डॉ. किरण दोशी, डॉ. राधिका जोशी, डॉ. धनंजया सारनाथ , राष्ट्रवादी महिला डॉक्टर सेलच्या जिल्हा प्रमुख डॉ आशा शितोळे, जयश्री शेलार, डॉ.नंदकुमार जोशी, डॉ आबाजी शिर्के, डॉ गीता पिलई, डॉ शीतल देसाई, डॉ प्रवीण नाईक, डॉ भारती दोशी, डॉ गुणाजी नलवडे, डॉ अश्विनी पाटील, डॉ राजेंद्र वायचळ, डॉ प्रिया शाह, डॉ अनुराधा सावंत, डॉ वैद्यही जोशी, प्रिया प्रसाद, भावना शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.