न्यू वुमेन्स फार्मसी कॉलेजतर्फे एडसविरोधी जनजागृती अभियान
schedule01 Dec 23 person by visibility 342 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित, न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींनी जागतिक एड्स दिनानिमित्त समाजात एचआव्ही संसर्गाविषयी जागरुकता करण्यासाठी प्रभातफेरी काढली.पथनाट्यातून एडसविरोधी प्रबोधन केले.
विद्यार्थिनींनी न्यू कॉलेज परिसर, बिनखंबी गणेश मंदिर, शिवाजी पेठ परिसर गर्ल्स हायस्कूल अशा विविध ठिकाणी एड्स संसर्गविषयी जागरुकता, रोगांपासून स्वतःच संरक्षण कसे करावे, रोगविषयीच्या अंधश्रद्धा, घ्यावयाची काळजी v त्यावरील उपाय यांच्यावर पथनाट्यातून प्रबोधन केले.
कॉलेजचे प्राचार्य डॉ रविंद्र कुंभार यांच्या मार्गद्शनाखाली व प्रा. वैष्णवी निवेकर , प्रा. दिव्या शिर्के, प्रा. पियुशा नेजदार यांनी नियोजन केले. उपक्रम सादर करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष बी.जी.बोरोडे, चेअरमन के. जी. पाटील, व्हाईस चेअरमन डी.जी. किल्लदार यांचे विशेष प्रोत्साहन लाभले.