आंदोलन तात्पुरते स्थगित, केएमटी बस सेवा सुरू
schedule12 Sep 22 person by visibility 631 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : हद्दवाढ कृती कृती समितीने सोमवारी पहाटे पाच वाजल्यापासून सुरू केलेले केएमटी सेवा बंद आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. यामुळे पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत बंद असलेली किमती बस सेवा दुपारी साडेबारानंतर पुन्हा सुरू झाली. कृती समिती व महापालिका प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार पहिल्या टप्प्यामध्ये मुडशिंगी आणि येवती या मार्गावरील तोट्यातील बस सेवा तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागामध्ये सुरू असलेल्या तोट्यातील मार्ग बाबत येत्या दहा दिवसांमसध्ये निर्णय घेतला जाईल या आश्वासनावर कृती समितीने आंदोलन स्थगित केले 22 सप्टेंबर रोजी कृती समितीचे पदाधिकारी व महापालिका प्रशासन यांच्यामध्ये बैठक होणार आ हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांना केएमटी बस सेवा पुरवू नये, ग्रामीण भागातील तोट्यातील मार्ग बंद करावे यासाठी कृती समितीने सोमवारी 12 सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजल्यापासून बुद्ध गार्डन येथील केएमटी वर्कशॉप येथे सगळ्या बसेस रोखून धरल्या. केएमटीची एक ही बस बाहेर पडू दिले नाही. पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत एकही बस बाहेर न पडल्याने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. केएमटी बस सेवा बंद झाल्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांचे हाल झाले.
[दुपारी बारा वाजता महापालिका अधिकारी व कृती समितीचे पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाली आणि पहिल्या टप्प्यात मुडशिंगी व येवती हे दोन मार्ग बंद करण्याचे ठरले. दरम्यान केएमटी बस सेवा सुरू झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजेपर्यंत 48 बस वर्कशॉपमधून प्रवासी वाहतुकीसाठी मार्गस्थ झाल्या.