जयप्रभा स्टुडिओमधून प्रचाराचा शुभारंभ, संग्राम भालकर अपक्ष म्हणून रिंगणात
schedule31 May 26 person by visibility 85 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ जयप्रभा स्टुडिओमध्ये झाला. ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिका बबिता काकडे यांच्या हस्ते फुलपाखरू या चिन्हाचे प्रचार पत्रिका अनावरण करून निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कोल्हापूरचे नृत्य दिग्दर्शक संग्राम यशवंत भालकर हे नृत्य विभागातून फुलपाखरू हे चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत.. ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ मध्ये भालकर परिवाराची चौथी पिढी म्हणून संग्राम भालकर आज काम करत आहेत... जयप्रभाच्या मारुतीराया समोर जेष्ठ कलाकारांच्या हस्ते मारुतीरायाचे पूजन करून प्रचारपत्रिकेचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी इम्तियाज बारगिर, संजय पाठारे, प्रसाद जगदग्नी, दिलावर मुजावर,अरविंद कोळी, महेश बगाडे, चंद्रकांत पाटील, सुनील घोरपडे, , जितेश कांबळे, सैफ बारगीर, रितेश सुतार, जयदीप निगवेकर, भूषण पाठक, आशिष हेरवाडकर, रोहन घोरपडे, योगेश सोनुर्लेकर,आकाश लिगाडे,पल्लवी चव्हाण, आर्या जुगादार, कशिश भालेकर, सई कुंभार, समन्वयक दिग्दर्शक संजय टिपूगडे उपस्थित होते.