Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जयवंत महाविद्यालयाच्या पेटंट डिझाईनवर भारत सरकारची मंजुरीची मोहोरग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एआयची कार्यशाळा, केएम फाऊंडेशनच्या माध्यमातून कळंब्यात उपक्रमगोकुळ अध्यक्ष निवडीचा वाद पोहोचला कोर्टात, समविचारी आघाडीची याचिका! शशिकांत पाटलांची निवड वैध ठरवा ! !पेटाळयाचा मास्तर…!लोकमंगलच्या माध्यमातून करवीरवासियांना बँकिंगच्या अधिकाधिक सुविधांची उपलब्धतागोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट ! दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी जमा !महापालिकेत महायुतीच्या पदाधिकाऱ्यात समन्वयाचा अभाव, केएमटीच्या सभापती -सदस्यांना निमंत्रण नाहीनिवडून दिलेल्या संचालकांना जर सत्तेत बसू देत नसाल तर लोकांचा प्रक्षोभ होईल- सतेज पाटलांनी सुनावले महायुतीला खडेबोल मला हरवण्यासाठी 29 जण प्रयत्नशील होते, मी विजयासाठी लढत होतो —  शिक्षक आमदार कौस्तुभ गावडेगोकुळच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांकडून जातीयवादी प्रचार, चुयेकरांना चेअरमन करण्याची जबाबदारी भविष्यात आम्हाला पार पाडावी लागणार

जाहिरात

 

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एआयची कार्यशाळा, केएम फाऊंडेशनच्या माध्यमातून कळंब्यात उपक्रम

schedule30 Oct 26 person by visibility 19 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,  -: करवीर तालुक्यातील कळंबा येथील विद्या मंदिर शाळेत पृथ्वीराज धनंजय महाडिक यांच्या के. एम. फाउंडेशनच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मोफत प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाची प्राथमिक माहिती, डिजिटल साधनांचा वापर, चित्रनिर्मिती, सादरीकरण तयार करणे, शैक्षणिक साहित्य निर्मिती तसेच प्रकल्पाधारित शिक्षण यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. तंत्रज्ञानाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर करण्याचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. कळंब्याचे माजी लोकनियुक्त सरंपच सागर भोगम यांनी, ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणारा आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.’असे नमूद केले. यावेळी नामदेव साळोखे, श्रीकांत जाधव, मुख्याध्यापक मोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शिक्षकांची उपस्थिती होती.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes