गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांकडून जातीयवादी प्रचार, चुयेकरांना चेअरमन करण्याची जबाबदारी भविष्यात आम्हाला पार पाडावी लागणार
schedule29 Oct 26 person by visibility 815 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ' गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर यांना दोन वेळेला अध्यक्षपदाने हुलकावणी दिली. त्यांना चेअरमन करण्याची जबाबदारी भविष्यात आम्हालाच पार पाडावी लागणार आहे.' असे सूचक वक्त राष्ट्रवादीचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्याचवेळी त्यांनी गोकुळ मध्ये खऱ्या अर्थाने महायुतीलाच बहुमत आहे महायुतीला मिळालेल्या मतांची संख्या 65000 पर्यंत जाते. तर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला मिळालेल्या मतांची बेरीज 48000 इतकी आहे.' असेही ते म्हणाले
नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत बोलताना हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या घडामोडी संदर्भात सूचक वक्तव्य केले गोकुळ मध्ये चेअरमन पद निवडीसाठी संचालकांची संख्या 14 इतकी आवश्यक आहे मात्र समविचारी आघाडीकडे तेरा संचालक आहेत तर आमच्याकडे महायुतीकडे संचालकांची संख्या 12 आहे. या यामध्ये अनेक तांत्रिक बाजू आहेत दरम्यान समविचारी आघाडीचे नेते आमदार सतीश पाटील दूध उत्पादकाने आम्हाला बहुमत दिले आहे असे म्हणतात तर मग चेअरमन निवड करण्याची जबाबदारी ही त्यांनी पूर्ण करावी.' असा टोलाही मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.
गोकुळचे माजी चेअरमन व माझे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांना सर्वसाधारण गटातून उमेदवारी द्यायला हवी होती. त्यांना ओबीसी गटातून उमेदवारी दिली ही एक अर्थाने माझ्याकडून चूक झाली. त्यांना टार्गेट करण्यात आले. माझा मुलगा पराभूत झाला याचे मला दुःख आहे. धर्मनिरपेक्षतेचा आव आणणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी गोकुळच्या राजकारणात जातीयवादी प्रचार केला.' असा गंभीर आरोपी मंत्री मुश्रीफ यांनी केला.