Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छछ दडजज डडच्च डडपेटाळयाचा मास्तर…!लोकमंगलच्या माध्यमातून करवीरवासियांना बँकिंगच्या अधिकाधिक सुविधांची उपलब्धतागोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट ! दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी जमा !महापालिकेत महायुतीच्या पदाधिकाऱ्यात समन्वयाचा अभाव, केएमटीच्या सभापती -सदस्यांना निमंत्रण नाहीनिवडून दिलेल्या संचालकांना जर सत्तेत बसू देत नसाल तर लोकांचा प्रक्षोभ होईल- सतेज पाटलांनी सुनावले महायुतीला खडेबोल मला हरवण्यासाठी 29 जण प्रयत्नशील होते, मी विजयासाठी लढत होतो —  शिक्षक आमदार कौस्तुभ गावडेगोकुळच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांकडून जातीयवादी प्रचार, चुयेकरांना चेअरमन करण्याची जबाबदारी भविष्यात आम्हाला पार पाडावी लागणार

जाहिरात

 

पेटाळयाचा मास्तर…!

schedule30 Oct 26 person by visibility 276 categoryशैक्षणिक

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : शाळा…शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं अतूट. विद्यार्थी माजी झाला आणि शिक्षक जरी सेवानिवृत्त झाला तरी त्यांच्यातील ऋणानुबंध कायम. विद्यार्थी मग तो बॅकबेंचर असो की स्कॉलर…प्रत्येकाचा एक आवडता शिक्षक असतो. आणि तो शिक्षक जर वर्गापुरता सिमित न राहता समाजाच्या खुल्या शाळेतही मुक्तपणे संचार करणारा, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करणारा…विद्यार्थी घडविता घडविता स्वत:ही विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवणारा असेल तर तो अनेकांसाठी आपसूकच आपलासा वाटतो, समाजासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आदर्श शिक्षक ठरतो… अशा विद्यार्थीप्रिय शिक्षकांची समाजात असंख्य उदाहरणे आहेत…कोल्हापुरातील पेटाळयाचा मास्तर…ही त्यापैकीच एक. हा मास्तर आणि पेटाळा हे सुद्धा वेगळं नातं आहे.

पेटाळा…न्यू महाद्वार रोडवरील परिसर. खरी कॉर्नर ते सिद्धाळा गार्डनचा परिसर. हा सारा परिसर म्हणजे जणू शाळांची दुनियाच. एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्सस हायस्कूल…न्यू हायस्कूल…रा. ना. सामाणी विद्यालय…डीएड कॉलेज…अशा विविध शाळा…दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या या साऱ्या ज्ञानशाखा…पेटाळयातील शाळा म्हणून त्या साऱ्या ओळखल्या जातात. आणि या पेटाळयातील मास्तर म्हणजे…कलाशिक्षक व राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे…

जवळपास ३२ वर्षाच्या शिक्षकी सेवेतून ते ३१ ऑक्टोबर २०२८ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने, दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीसमोर…‘पेटाळयाचा मास्तर…! हा फलक विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्यातील वेगळया नात्याची प्रचिती घडवित आहे. आजी माजी विद्यार्थी न्यू मॉडेल, न्यू हायस्कूल, स.म. लोहिया हायस्कूल, सार्थक क्रिएशन्स, कोल्हापूर जिल्हा नृत्यपरिषद, कोल्हापूर डान्स असोसिएशनने एकत्र येत, ‘पेटाळयाचा मास्तर…!’ला सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या फलकावरील ‘मास्तरची निवृत्ती ? न्हाई…ही तर नवी आवृत्ती…’या सात शब्दांतून सागर बगाडे यांच्या बहुविध व्यक्तिमत्वाची ओळख घडते. शिक्षक, कलाशिक्षक, नर्तक, लेखक, निवेदक…गाजावाजा न करता गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व सांभाळणारा शिक्षक अशी विविधांगी ओळख आहे.

सागर बगाडे यांचा सारा प्रवास हा थक्क करणारा…शून्यातून सुरुवात करुन राष्ट्पती आदर्श शिक्षक पुरस्कार पर्यंतची वाटचाल ही खाचखळग्याची…संघर्षाची…स्वतची दुनिया निर्माण करणारी आहे.

 ताराबाई पार्क येथील विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमधून शिक्षकी पेशाला प्रारंभ झाला. विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दिवंगत सचिव व प्राचार्या शुभांगी गावडे या शिक्षक बगाडे यांना भाऊ मानायच्या. विवेकानंदमध्ये काही वर्षे काम केल्यानंतर बगाडे हे  दि न्यू एज्युकेशन सोसायटीतील न्यू हायस्कूल येथे २००१ मध्ये  रुजू झाले. त्याठिकाणी सहा, सात वर्षे काम केले. २००८ मध्ये एस. एम. लोहिया हायस्कूलमध्ये बदली झाली. गेली अठरा वर्षे ते या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दि न्यू एज्युकेशन सोसायटीचा एक फेब्रुवारीला वर्धापनदिन आणि त्या सोहळ्यात कलाशिक्षक बगाडे यांच्या मार्गदर्शखाली विद्यार्थ्यांचा कलाविष्कार…हे सारं थक्क करणारं.  ‘विद्यार्थी हेच आयुष्य’असं समजून हा शिक्षक सक्रिय राहिला. वर्ग, शाळा, शिक्षक या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांशी नाते जडले. विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांच्यावर पुस्तक निर्मिती करत आहेत. मास्तरांना शब्दबद्ध करत आहेत. विद्यार्थ्यांचे हे जे प्रेम मिळाले ते माझ्यासाठी अनमोल असल्याच्या बगाडे यांच्या भावना आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes