महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
महार वतनाची जमीन विक्रीचा अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मंजूर करुन घेण्यासाठी दीड लाखाची लाच घेताना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून आणि लिपिक कम डीटीपी ऑपरेटरला रंगेहात पकडले. अनंता विठ्ठलराव भानुसे (वय ५१ वर्षे पद - अव्वल कारकून कुळवहिवाट शाखा, उपजिल्हाधिकारी महसुल, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली) आणि दिलीप निवृत्ती देसाई (वय 43 वर्षे पद - लिपिक कम डाटा इंट्री ऑपरेटर , रोजगार हमी योजना जिल्हाधिकारी कार्यालय सांगली) अशी लाच घेणाऱ्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली. ५१ वर्षी तक्रारदार आणि खरेदी करणार असलेल्या जमिनीचे मालकाने त्यांची महारवतनाची जमिन विक्री करण्याची परवानगी मिळणेबाबतचा अर्ज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात दिला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगुन जमीन विक्रीचा अर्ज मंजुर करुन देण्यासाठी स्वतःकरीता व वरिष्ठांचेकरीता दोन लाख रुपये लाचेची मागणी अव्वल कारकून अनंता भानुसे यांनी केली. त्यानंतर तक्रारदाराने सांगली जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारची खातरजमा करुन पोलिसांनी सापळा रचला. भानुसे दीड लाखावर तडजोड करत लाचेची मागणी केली. दीड लाखाची लाच घेताना पोलिसांनी सापळा रचून अनंता भानुसे आणि लिपीक दिलीप देसाई याला दीडा लाखाची लाच स्वीकारताना पडकले.
कोल्हापूर विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक आणि सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, पोलीस नाईक धनंजय खाडे, प्रितम चौगुले, पोलिस कॉन्स्टेबल अजित पाटील, सीमा माने, चालक अनिस वंटमुरे यांनी कारवाई केली