Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शाहू मानेंचा केआयटीत सत्कारसतेज पाटलांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नगरसेवकांचे प्रीतीभोजन, खुलेपणाने रंगली राजकारणावर चर्चा !किसनराव मोरे ट्रस्टतर्फे पुरस्कार जाहीर, बुधवारी पुरस्कार वितरण समारंभकोल्हापूर उद्यम  सोसायटीच्या अध्यक्षपदी जयश्री जाधव, उपाध्यक्षपदी सुधाकर सुतारकोल्हापुरातून सात शहरांशी थेट विमानसेवा, मुंबई-अहमदाबाचे विमान आता ७६ आसनी !वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस ऑगस्टपासून कोल्हापुरात धावणार, स्वातंत्र्यदिनी चार्जिंग स्टेशनचा शुभारंभकैलास मानसरोवर यात्रेसंबंधी सहज सेवा ट्रस्टतर्फे मोफत मार्गदर्शनमहापूर नियंत्रणाच्या उपाययोजनेसंबंधी सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाची चर्चाप्रा. संदीप पाटील यांना पीएचडीयुद्धात भारताच्या विजयासाठी-सैनिकांच्या सुरक्षेसाठी अंबाबाईला साकडे

जाहिरात

 

राजेंद्र पाटील-यड्रावकरांच्याकडून शरण साहित्य अध्यासनासाठी एक लाखाचा निधी

schedule23 Sep 23 person by visibility 351 categoryसामाजिक


कोल्हापूर, दि. २२ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठात सुरू होणाऱ्या शरण साहित्य अध्यासनाकरिता आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी एक लाख रुपयांचा प्रथम निधी प्रदान केला आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या दि. २५ मार्च २०२३ रोजी झालेल्या अधिसभेमध्ये विद्यापीठात शरण साहित्य अध्यासन स्थापन करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. सदस्य अभिषेक मिठारी यांनी हा ठराव मांडला होता. या शरण साहित्य अध्यासनाकरिता लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन कोल्हापूर लिंगायत समाज संस्थेने केले होते. संस्थेच्या या आवाहनाला तत्परतेने प्रतिसाद देत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून १ लाख रुपयांचा प्रथम निधी देणगी स्वरूपात देण्यात आला. सदरचा निधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे आज सरलाताई पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
यापूर्वी एप्रिल २०२३मध्ये शरण साहित्य अध्यासनासाठी कोल्हापूर बसव केंद्रातर्फे विद्यापीठास अकरा हजार रुपयांची शरण साहित्य ग्रंथसंपदा भेट देण्यात आली आहे.
आज निधी प्रदान प्रसंगी अधिसभा सदस्य अॅड. अभिषेक मिठारी, राजशेखर तंबाके, विलास आंबोळे, सी. व्ही. चौगुले, यश आंबोळे, दत्ता घुटुकडे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes