विसर्जन मिरवणुकीत पोलिसांशी झटापट, उत्तरेश्वर पेठेतील तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल
schedule12 Sep 22 person by visibility 1069 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हूर:
शुक्रवारी मध्यरात्री सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मार्गावर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समवेत वादावादी करून झटापट करणाऱ्या उत्तरेश्वर पेठेतील तेरा जणांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. या झटापटीत संभाजी माने या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पायाला दुखापत होवून ते जखमी झाले आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तेरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गणेश विसर्जन मिरवणुकीत मध्यरात्री बारानंतर पोलीस प्रशासनाने मिरवणूक मार्गावरील सर्व मंडळांच्या साऊंड सिस्टीम बंद केली. त्याला कार्यकर्त्यांनी विरोध केला. उत्तरेश्वर पेठेतील कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मारून मिरवणूक मार्ग अडवला. त्यांच्यामागे असलेल्या अन्य मंडळांनाही पुढे जाऊन दिले नव्हते. कार्यकर्त्यांची समजूत घालण्यासाठी पोलिस अधिकारी, अंमलदार आणि कर्मचारी गेले असता कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत वाद घातला. या वादावादीच अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी त्यांची झटापट झाली. त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल संभाजी माने यांच्या पायास दुखापत झाली आणि ते जखमी झाले.
पोलिसांकडून मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे, ‘ कार्यकर्त्यांनी पोलिसांचा आदेश डावलून पुन्हा साऊंड सिस्टिम लावली आणि त्याचा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये पूर्ण महाद्वार रोड रात्री बाराला बंद झाला. पण एकट्या वाघाने रात्री दोनला साऊंड वाजवला आणि गाजवला. लावली ताकद दिलं दाखवून असा मजकूर असलेला व्हिडिओ व्हायरल करून अन्य मंडळांना चिथावणी दिली. ”
मिरवणुकीतील कामामुळे सोमवारी पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी भगवान पाटील यांनी तेरा कार्यकर्त्यांच्या विरोधात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. गुन्हा नोंद असलेल्या कार्यकर्त्यांची नावे रोहित वसंतराव माने, अजिंक्य दत्तात्रय शिद्रुक, वैभव संजय चव्हाण, निखिल दिलीप तिबिले, निखिल अशोक राबाडे, यश चंद्रकांत चव्हाण, विपुल विजय साळोखे, प्रेम योगेश येळावकर, आकाश रामचंद्र वर्णे, वैभव शिवाजी मोरे, रोहित उर्फ गोट्या शिवाजी गाडगीळ, (सर्व राहणार उत्तरेश्वर पेठ) डॉल्बी ऑपरेटर संग्राम पाटील, लाईट ऑपरेटर अमित पाटील अशी आहेत.