रंगबहारच्या रेखाटन स्पर्धेत ७० कलाकारांचा सहभाग
schedule23 Jun 24 person by visibility 380 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कलाक्षेत्रामध्ये विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या रंगबहार संस्थेच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त पंचगंगा घाट परिसरामध्ये संस्थेच्यावतीने प्रत्यक्ष रेखाटन स्पर्धा झाली. पंचगंगा घाट परिसरात रविवारी, सकाळी ८.३० ते दुपारी या वेळेत स्पर्धा झाली. कोल्हापूरसह गडहिंग्लज, सांगली, बेळगाव, इचलकरंजी येथील ७० कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला.
पंचगंगा घाट आणि छत्रपती घराण्याच्या समाधीस्थळ परिसरातील मंदिराची शीघ्र रेखाटन( स्केचिंग ) कलाकारांनी पेन्सिल पेनच्या साह्याने साकार केली. स्पर्धा खुल्या गटात झाली. 'रंगबहार' या संस्थेचे अध्यक्ष धनंजय जाधव, सचिव संजीव संकपाळ यांच्या हस्ते विजेत्या कलाकारांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
दृश्य कलेच्या क्षेत्रात व्याख्यानं, प्रात्यक्षिके, संमेलने, कार्यशाळा, प्रदर्शने अशा उपक्रमांतून रंगबहारने लोकजागरही केला आहे. रंगबहारच्या ४६ व्या वर्धापन दिनी शीघ्र रेखाटन ( स्केचिंग ) स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक फिरोज शेख तर द्वितीय क्रमांक साईराज खुपेरकर तृतीय क्रमांक रोहित गायकवाड आणि उत्तेजनार्थ सौरभ देवेकर,अपूर्व पेडणेकर, ऐश्वर्या पाटील,आशेर फिलीप, अश्मी घाडगे यांनी यांनी प्राप्त केले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संजीव संकपाळ, विजय टिपुगडे,मनोज दरेकर,बबन माने यांनी काम पहिले. याप्रसंगी प्राचार्य अजेय दळवी, गजेंद्र वाघमारे ,मनिपद्म हर्षवर्धन,राहुल रेपे,प्रवीण वाघमारे, अभिजीत कांबळे, सुधीर पेटकर, नागेश हंकारे, सर्वेश देवरुखकर, सुदर्शन वंडकर आदी उपस्थित होते.