Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
667 दूध संस्था मतदानास पात्र, गोकुळच्या माजी चेअरमनासह संचालकांचा आनंदोत्सव जुनी पेन्शनसाठी शनिवारी  शिक्षकांचा सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चायाद रख सिकंदर...महापालिका सभागृहात आदिल फरासांची माफी अन कव्वालीचे सादरीकरणनदी पुनर्जीवन प्राधिकरणामार्फत कोल्हापूर महापालिकेला निधी उपलब्ध करावा -  भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधवयंदा शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी : नगरसेवक ऋतुराज क्षीरसागरगोखले कॉलेजमध्ये वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विजेत्यांना बक्षीस प्रदानप्राचार्य डॉ. धनाजी कणसे, डॉ. आर. आर. कुंभार, प्रा. अरुण पाटील, प्रा. गजानन माळी यांना राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कारनगरसेवक हमरीतुमरीवर, प्रशासनाचा मोठा निर्णय ! महापालिकेची गुरुवारची सर्वसाधारण सभा होणार पोलिस बंदोबस्तात ! !ज्ञानपीठ विजेते लेखक वि.स. खांडेकर हे मानवी जीवनाचे भाष्यकार, त्यांच्या साहित्याची प्रासंगिकता काळाच्या पुढे - डाॅ. भालचंद्र मुणगेकरखाजगी प्राथमिक शिक्षक सेवक  पतसंस्थेच्या चेअरमनपदी रोहिणी येडगे, व्हाइस चेअरमनपदी चेअरमनपदी शिवाजी सोनाळकर 

जाहिरात

 

667 दूध संस्था मतदानास पात्र, गोकुळच्या माजी चेअरमनासह संचालकांचा आनंदोत्सव

schedule03 Sep 26 person by visibility 210 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या घडामोडीत मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील  अरुण डोंगळे यांच्या दृष्टीने दिलासादायक निर्णय गुरुवारी मिळाला. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अवसायानातील ४९२  दूध संस्था व कार्यक्षेत्राबाहेरील ठरावधारक म्हणून तक्रार झालेल्या १७५ दूध संस्था अशा एकूण ६६७ दूध संस्थांच्या मतदानास पात्रतेचा निकाल दिला. हा निकाल समजतात गोकुळच्या माजी चेअरमन व संचालकाने आनंद व्यक्त केला. ते, गडहिंग्लज संपर्क दौऱ्यात होते.  गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रचाराच्या गडहिंग्लज दौऱ्यावर असलेल्या सत्ताधारी संचालक मंडळातील माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील , माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ, संचालक युवराज पाटील, अजित नरके, डॉ. सुजित मिणचेकर, नंदकुमार ढेंगे, बाळासाहेब खाडे, रणजितसिंह पाटील, किसन चौगले, अमरसिंह पाटील, एस. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे  माजी उपाध्यक्ष सतीश पाटील -गिजवणेकर, राहुल शिरकोळी, विजय दाभाडे, शिवराज पाटील यांनी असा आनंद व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes