जुनी पेन्शनसाठी शनिवारी शिक्षकांचा सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा
schedule03 Sep 26 person by visibility 31 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय समिती यांच्या वतीने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित , अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त झालेल्या व त्यानंतर १०० टक्के अनुदान प्राप्त झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (पेन्शन) नियम, १९८२ नुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
या मागणीसाठी शनिवारी पाच सप्टेंबर 2026 रोजी राज्यभरातील कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर बांधवांनी काळे मास्क लावून सहकुटुंब व सहपरिवार जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा निघणारआहे, तरी सर्वानी सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेचा महत्त्वाचा प्रश्न असून, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.या राज्यव्यापी मूक मोर्चात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन खालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी दादासाहेब लाड, बाबासाहेब पाटील, सुरेश संकपाळ, दत्तात्रय पाटील, एम. आर. पाटील, सुरेश कानडे, शांताराम तौंदकर, दीपक पाटील, बाजीराव साळवी, के. एस. पोतदार, मुकुंद कुंभार, दामोदर एरूडकर, किशोर बरगे, मच्छिंद्र नाळे, निवास रेळेकर, भरतनिकम व राजेंद्र कोरे उपस्थित होते. जुनी पेन्शन हा आमचा हक्क असून, न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहील,” असा निर्धार यावेळी करण्यांत आला.