Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोखले कॉलेजमध्ये वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विजेत्यांना बक्षीस प्रदानप्राचार्य डॉ. धनाजी कणसे, डॉ. आर. आर. कुंभार, प्रा. अरुण पाटील, प्रा. गजानन माळी यांना राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कारनगरसेवक हमरीतुमरीवर, प्रशासनाचा मोठा निर्णय ! महापालिकेची गुरुवारची सर्वसाधारण सभा होणार पोलिस बंदोबस्तात ! !ज्ञानपीठ विजेते लेखक वि.स. खांडेकर हे मानवी जीवनाचे भाष्यकार, त्यांच्या साहित्याची प्रासंगिकता काळाच्या पुढे - डाॅ. भालचंद्र मुणगेकरखाजगी प्राथमिक शिक्षक सेवक  पतसंस्थेच्या चेअरमनपदी रोहिणी येडगे, व्हाइस चेअरमनपदी चेअरमनपदी शिवाजी सोनाळकर कोल्हापुरात मंत्र्यांच्या समर्थकांची अधिकाऱ्यांवर दमबाजी ! कार्यालय पेटवण्याची, बुटाने मारण्याची धमकी ! !डी वाय पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकारकार्यालयात नगरसेवकांची भांडणे, चौकात कार्यकर्ते आमनेसामने! महापालिकेचा बनतोय आखाडा, पदाधिकारी म्हणतात हा कौटुंबिक वाद !!आयुक्तांच्या कार्यालयातच शारंगधर देशमुख - आदिल फरास एकमेकांना भिडले !  चौकात कार्यकर्ते जमले, पोलिसांचा हस्तक्षेप- नेत्यांची फोनाफोनी!!शिक्षक मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मला मिळेल, रविवारी प्रचाराचा शुभारंभ करणार - मंगेश चिवटे

जाहिरात

 

गोखले कॉलेजमध्ये वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विजेत्यांना बक्षीस प्रदान

schedule02 Sep 26 person by visibility 5 categoryशैक्षणिक

गोखले कॉलेजमध्ये इंटर स्कूल व कॉलेज वादविवाद स्पर्धेमध्ये

महाराष्ट्र न्यूजवन प्रतिनिधी :   गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमध्ये श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशन, इंन्डियन वुमन सायंटिस्ट असोसिएशन आणि गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर यांच्या वतीने संयुक्त विद्यमाने आंतरशालेय  व कॉलेज स्तरावर वादविवाद स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. माध्यमिक विभागात श्री. शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पेठवडगांव प्रथम व ज्युनिअर कॉलेज विभागामध्ये गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला

 शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. गुरव, शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन व युवती सचेतना फौंडेशनच्या अध्यक्षा प्रो. डॉ. मंजिरी अजित मोरे, फौंडेशनच्या सचिव ऋतुजा पृथ्वी मोरे यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून स्पर्धेचे उदघाटन झाले. प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. आर. व्ही. गुरव यांनी बोलताना वादविवाद स्पर्धा ही केवळ बोलण्याची स्पर्धा नसून विचार करणेची, तर्क मांडण्याची आणि समोरच्याचे विचार समजून घेण्याची कला आहे. एखादया विषयाचा विविध बाजून विचार करणेची सवय लागते त्यामुळे विचारशक्ती प्रगल्भ बनते आपले मत योग्य उदाहरणे व कारणांसह मांडण्याची क्षमता विकसित होते. स्पर्धेमुळे आत्मविश्वास वाढून भाषा कौशल्य वाढते श्रवणाची सवय लागते निर्णय क्षमता, संवाद कौशल्य आणि नेतृत्वाची भावना विकसित होवून सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांची जाणीव होते. संवादाने सर्व प्रश्न सुटतात म्हणून आजच्या काळात वादविवाद स्पर्धांचे सतत आयोजन करणेची गरज आहे असे मत व्यक्त केले. विजेत्या शाळांना ट्रॉफी रोख रक्कम प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमास परीक्षक म्हणून अमोल शिंगे, सुनंदा नाईक, शितल कदम, प्रा. डॉ. आर.एम.बिसुरे, डॉ. सी. आर. चौगुले यांनी काम पाहिले.

या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळोच सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलत देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी अजित मोरे, कौंन्सिल सदस्य प्रा. पी. बी. झावरे, उपप्राचार्य आर. एस. यादव, पर्यवेक्षक एम.एल.धनवडे यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास प्रा. डॉ. के.के. पाटोळे, प्रा.डॉ. एस.एस.लेंडवे, एस.एस. नागन्नावर, जे.यु.कुंभार, आर.एम.पाटील,एस.पी. कवठेकर, मनिषा हातगीने,  डॉ. वाय.ए.पाटील, आदी उपस्थित होते. प्रा.ए.यु.पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. पी. डी. आवटे यांनी आभार मानले

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे, माध्यमिक विभाग : प्रथम क्रमांक: श्री शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कागल. फस्ट रनर :- न्यायमुर्ती रानेडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सेनापती कापशी. उच्च माध्यमिक विभाग :- प्रथम क्रमांक: गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर. फस्ट रनर :- वडगांव विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वडगांव

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes