संगीता पोवार चालविणार पोवार कुटुंबीयांचा समाजकार्याचा वारसा
schedule23 Dec 25 person by visibility 35 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सामाजिक काम, लोकसंपर्क आणि अडचणीच्या काळात मदतीला धावून जाण्याची वृत्ती यामुळे कोल्हापुरातील काही कटुंबे ही समाजकारण आणि राजकारणात आपली ओळख टिकवून आहेत. महाराणा प्रताप चौकातील पोवार कुटुंबीय ही त्यापैकी एक. त्यांच्या या कामाची दखल घेत मतदारांनी त्यांना महापालिकेवर अनेकदा प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडून दिले. माजी महापौर आर. के. पोवार, त्यांच्या पत्नी मुक्ताबाई पोवार, पुतण्या रमेश पोवार यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जनतेशी नाळ कायम ठेवली. जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत स्थायी समितीचे माजी सभापती रमेश पोवार यांच्या पत्नी संगीता पोवार या प्रभाग क्रमांक बारामधून निवडणूक लढविणार आहेत. शिवसेनेकडून त्या इच्छुक आहेत. त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. धनुष्यबाण चिन्हावर त्या निवडणूक लढणार आहेत.
स्थायी समितीचे माजी सभापती रमेश पोवार यांनी २०१० ते २०१५ या कालावधीत महापालिकेवर नगरसेवक म्हणून काम करताना आपली छाप उमटविली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते. स्थायी समितीचे सभापती म्हणून विकासकामांवर भर दिला. विकास प्रकल्पांना चालना दिली. माजी महापौर आर. के. पोवार यांच्या समाजकार्य व राजकीय वारसा चालविणाऱ्या रमेश पोवार यांनी प्रभागातील नागरिकांच्या हाकेला ओ देत विविध कामे केली. प्रभागासाठी सदैव उपलब्ध असणारा कार्यकर्ता, नगरसेवक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. प्रभागात पायाभूत सुविधा निर्माण केल्या. नागरिकांची महापालिकेशी निगडीत विविध कामांची सोडवणूक केली.
२०१५ मधील महापालिका निवडणुकीत प्रभाग महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला. यावेळी त्यांच्या पत्नी संगीता या निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. थोडया मतांनी विजयाने हुलकावणी दिली. मात्र विजय पराजयाचा विचार न करता रमेश पोवार हे सामाजिक कार्यात,राजकारणात सक्रिय राहिले. प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जात मदत कार्य चालू ठेवले. नगरसेवक म्हणून पदावर नसतानाही त्यांनी, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून प्रभागातील विकासकामासाठी निधी मंजूर करुण आणला.
महायुती सरकारचे विकासात्मक कामकाज पाहून रमेश पोवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेली अनेक वर्षे मतदारसंघातील लोकांच्या ते संपर्कात आहेत. महापालिका निवडणुकीत रमेश पोवार यांच्या पत्नी संगीता पोवार या लढणार आहेत. त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. पोवार यांचा उत्तम जनसंपर्क, लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणूक करण्याची धडाडी यामुळे त्यांच्या उमेदवारीला पसंती मिळत आहे.