तुटलेली दोरी पुन्हा बांधता येते, मुश्रीफ यांच्या विधानावर सतेज पाटलांचे मिश्किल उत्तर
schedule21 Dec 25 person by visibility 247 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांच्यासोबतचे मैत्रीचे दोर तुटले आहेत असे विधान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते. मंत्री मुश्रीफ यांच्या या विधानाविषयी पत्रकारांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांना छेडले असता त्यावर त्यांनी अतिशय मिशिकलपणे उत्तर दिले. आमदार पाटील म्हणाले, "तुटलेली दोरी पुन्हा बांधता येते."
नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेस व महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आमदार पाटील यांना मंत्री मुश्रीफ यांनी केलेल्या विधानासंदर्भात विचारले. त्यावर आमदार पाटील म्हणाले, " होय, मंत्री मुश्रीफ जे बोलले ते खरे आहे. आता त्यांचा प्रांत आणि आमचा प्रांत वेगळा आहे. नगरपालिका निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो. प्रत्येक निवडणुकीचे वेगवेगळे संदर्भात असतात. स्थानिक राजकारण असते. " असे उत्तर देत त्यांनी तुटलेली दोरी पुन्हा बांधता येते असे विधान करताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी व इतर मित्र पक्ष असे सगळेजण आम्ही एकत्र लढणार आहोत. काँग्रेसची समिती महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षाशी जागा वाटपासंदर्भात चर्चा करत आहे. शिवसेना ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांच्यासोबत दोन बैठका झाले आहेत. आम आदमी पक्षासोबत ही चर्चा झाली आहे. चार सदस्य प्रभाग रचना असल्यामुळे उमेदवारा सक्षम, लोकसंपर्कातील असावा याकडे लक्ष दिले जात आहे. काँग्रेसतर्फे आयोजित मुलाखतीला मोठी गर्दी झाली होती यावरून लोकांचा व कार्यकर्त्यांचा काँग्रेसवरील विश्वास पुन्हा एकदा सिद्ध होत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले पत्रकार परिषदेवेळी स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, भूपाल शेटे उपस्थित होते.