महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे २६ रुग्ण आढळले. कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यात सर्वाधीक प्रत्येकी दहा रुग्ण आढळले. केंद्र सरकारकडून कोरोनासंबंधी खबरदारीच्या मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यास सुरुवात झाली असून आज शनिवारी २६ रुग्णांची नोंद झाली आहे. कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यात प्रत्येकी दहा, इचलकरंजी आणि राधानगरी तालुक्यात प्रत्येकी दोन, भुदरगड तालुक्यात एक तर रत्नागिरी जिल्ह्यात एक रुग्णाला कोरोनाची लागन झाली आहे. सध्या १२ कोरोना रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे आदेश केंद्र सरकार आरोग्य विभागाने दिल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांनी जाण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. तेच गर्दीत मास्क घालण्याची सूचना केली आहे. हात पाय धुणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी घालण्याबरोबर रुग्णांची चाचणी करण्याची सूचना केली आहे श्वसनाच्या रुग्णांची डॉक्टरांकडून नियमित तपासणी करुन घेण्याची सूचना केली आहे.
कोरोनाच्या नवीन गाईडलाईन आली असून रमजान महिना, जोतिबा यात्रा, अंबाबाई रथोत्सोव, यात्रा आणि जत्रामध्ये मार्गदर्शक सूचनांचे पालन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.