शहरातील 15 दलित वस्त्या होणार प्रकाशमान, दोन कोटीचा निधी मंजूर
schedule06 Nov 25 person by visibility 220 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील सुमारे १५ दलित वस्त्यांमध्ये सोलर हायमास्ट लॅम्प बसविण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे दोन कोटी निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत २०२५ - २६ या वर्षासाठी दोन कोटी निधीची मंजुरी देण्यात आली आहे. दलित वस्त्यांमध्ये राहणा-या सामान्य नागरिकांना मिळणा-या सोयी सुविधा अपुऱ्या आहेत. या नागरिकांचे जगणे बदलून त्यांच्याही वाट्याला चांगले आयुष्य यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षात या वस्त्यांमधील विकासकामांसाठी निधी देवून जीवनमान सुधारण्यास प्राधान्य दिले जात आहे. आजही शहरातील अनेक वस्त्यांमध्ये अंधाराचे साम्राज्य असल्याचे चित्र दिसत होते. याकरिता या ठिकाणी सोलर हायमास्ट लॅम्प बसविण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील दलित वस्त्या प्रकाशमय होणार असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी म्हटले आहे.शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर कसबा बावडा, मातंग वसाहत कसबा बावडा, रमणमळा, कनाननगर, सदर बाजार, विचारेमाळ, इंदिरानगर झोपडपट्टी शिवाजी पार्क, सिद्धार्थनगर, सोमवार पेठ, सिद्धार्थ गल्ली लक्ष्मीपुरी, वारे वसाहत, गंजीमाळ, यादवनगर, मातंग वसाहत राजारामपुरी, टाकाळा खण माळी कॉलनी या परिसरात हे सोलर हायमास्ट लॅम्प बसविण्यात येणारआहेत.