तावडे हॉटेल जवळची कमान आज रात्री पाडणार
schedule06 Nov 25 person by visibility 57 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : तावडे हॉटेल जवळची कमान गुरुवारी (6 नंबर 2025 ) रात्री दहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत महानगरपालिकेच्यावतीने पाडण्यात येणार आहे. दरम्यान वाहतूकदारांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांच्या मदतीने तावडे हॉटेल मार्गे कोल्हापुरात येणारी वाहतूक या कालावधीसाठी उचगाव मार्गे वळविण्यात आले आहे.तसेच कोल्हापूर शहरातून तावडे हॉटेलमार्गे बाहेर जाणारी वाहतूक छत्रपती ताराराणी चौकातून बावडा रोडने शिये मार्गे वळवण्यात येणार आहे. तरी या कालावधीमध्ये कोल्हापूर शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेत केलेल्या बदलाची नोंद घेऊन प्रशासना सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे..