शिवसेनेत इनकमिंगचा धडाका, विविध पक्षातील नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा प्रवेश
schedule05 Nov 25 person by visibility 307 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांना इनकमिंगचा धडाका लावला आहे. यामध्ये आघाडी घेतली आहे, शिवसेनेने. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी (पाच नोव्हेंबर २०२५) कोल्हापुरात झालेल्या मेळाव्यात कोल्हापुरातील दहाहून अधिक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये माजी महापौर सरिता मोरे, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, रमेश पोवार, परिवहन समितीचे माजी सभापती अजित मोरे, मृदुला पुरेकर, माजी नगरसेवक रामचंद्र भाले, रत्नेश शिरोळकर, राजू हुंबे, स्मिता माळी, वैभव माळी, अजय इंगवले, विकी महाडिक, रणधीर महाडिक, नेपोलिनय सोनुले, दुर्गेश लिंगरस, योगेश शिंदे, विराज ओतारी, अनिरुद्ध सांगावकर अभिजीत ओतारी ऋषिकेश ओतारी, गणेश भोसले, इंद्रजीत घुणकीकर, विनायक कोरडे, पूनम फडतारे, अंजली जाधव, अर्जुन आंबी, विचारेमाळ येथील शुभांगी भोसले आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी नेते मंडळी प्रयत्नशील आहेत. त्या अनुषंगाने बुधवारी कोल्हापुरात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री उदय सामंत मंत्री शंभूराजे देसाई खासदार धैर्यशील माने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार जयश्री जाधव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, रवींद्र माने, माजी महापौर सुनील कदम, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, हर्षल सुर्वे यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हा शब्द पाळणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांनाच सन्मान केला जातो म्हणून शिवसेनेकडे अनेकांचा ओघ वाढत आहे. आयुष्यात पैसे संपत्ती किती मिळवली, यापेक्षा माणसे किती कमवलीय हे महत्त्वाचे आहे. महायुतीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवली जाईल असे स्पष्ट केले. जिल्हाप्रमुख विजय बलुगडे यांनी आभार मानले