केआयटीच्या अभिग्यानमध्ये यंदा सुदर्शन हसबनीस, संदीप वासलेकर, अभिनय बेर्डे ! विद्यार्थ्यांशी साधणार संवाद !!
schedule06 Nov 25 person by visibility 183 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या कोल्हापूर इन्स्टिटयूट ऑ टेक्नॉलॉजी ऑफ इंजिनीअरिंगच्यावतीने (केआयटी) रविवारी (९ नोव्हेंबर २०२५) ‘अभिग्यान -२५’आयोजित केले आहे. सायबर संस्थेतील आनंदभवन येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी दिली. यंदा अभिग्यानचे तेरावे वर्ष आहे.
अभिग्यान अंतर्गत तंत्रज्ञान, सुरक्षा, कला, क्रीड, समाजकारण, साहित्य, सिनेमा क्षेत्रातील आयकॉन असणाऱ्या दिग्गजांना आमंत्रित केले जाते. ‘अभिग्यान -२५’मध्ये निवृत्त लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक लेखक संदीप वासलेकर, कम्प्युटर क्षेत्रातील तज्ज्ञ संजय काटकर, एआय क्षेत्रातील अभ्यासक चिन्मय गव्हाणकर, सिने कलाकार अभिनय बेर्डे, पत्रकार विलास बडे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. अभिग्यान -२५ साठी आतापर्यंत विविध कॉलेजच्या ८०० विद्यार्थ्यांना सहभाग निश्चित केला आहे. सभागृहाची बैठक क्षमता ८५० पर्यंत आहे.
या पत्रकार परिषदेला वॉक विथ वर्ल्डचे समन्वयक प्रा. अमर टिकोळे, सहसमन्यवक प्रा. प्रसाद जाधव, प्रा. अमित वैद्य, व्यासपीठाचे विद्यार्थी पदाधिकारी आदित्य साळोखे, समीक्षा बुधले आदी उपस्थित होते.