शाहूवाडीत बिबटयाचा हल्ला, वृद्ध दाम्पत्यांचा मृत्यू
schedule19 Oct 25 person by visibility 131 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सर्वत्र सणाची धामधूम सुरु असताना शाहूवाडी तालुक्यात रविवारी मन सुन्न करणारी घटना घडली. परळेनिनाई परिसरात बिबट्याने वृद्ध दाम्पत्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये रखूबाई कंक (वय ७० वर्षे)व निनू कंक (वय ७५ वर्षे) हे पती-पत्नी ठार झाले. रखूबाई यांचा एक हात व पाय खाल्याचे निदर्शनास आले. तर निनू यांचा मृतदेह धरणाच्या पाण्यावर तरंगताना आढळला. या हिंस्त्र घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंक दाम्पत्य हे गोलिवणे गावचे आहेत.ते, रविवारी सकाळी परळीनिनाई येथील धरण बॅकवॉटर परिसरात शेळया चरावयास गेले होते. घटनेची माहिती समजताच शाहूवाडी पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. हा हल्ला बिबट्याने केला असावा, अशी शक्यता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. दोन शेळयाही गायब आहेत.