सत्वशिला साळुंखे यांचे निधन
schedule16 Dec 25 person by visibility 81 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर : नागाळा पार्क येथील सत्वशिला हितेंद्र साळुंखे (वय ५१) यांचे निधन झाले. येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व विवेकानंद कॉलेजचे सहाय्यक ग्रंथपाल हितेंद्र सुर्याजीराव साळुंखे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सासरे, दीर, नणंद असा मोठा परिवार आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान रक्षाविसर्जन बुधवारी सतरा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे होणार आहे.