राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे उमेदवारी मागणी अर्जास प्रारंभ
schedule15 Dec 25 person by visibility 34 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागणीस प्रारंभ झाला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्या टॉवर या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शहराध्यक्ष आर. के. पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, महिला अध्यक्ष पद्मजा तिवले, कोल्हापूर उत्तर विधानसभा अध्यक्ष गणेश जाधव, प्रदेश प्रतिनिधी निरंजन कदम उपस्थित होते. बैठकीत, इच्छुक उमेदवारांकडून १७ डिसेंबर पासून फॉर्म भरून घेण्याविषयी सूचना करण्यात आल्या. फॉर्म भरून घेणे व इतर कायदेशीर गोष्टीची जबाबदारी गणेश जाधव व ॲड. अनिल घाटगे यांच्यावर सोपविली. १७ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत शिवाजी स्टेडियम गाळा नंबर 1, राष्ट्रवादी कार्यालय या ठिकाणी पक्षाच्यावतीने उमेदवारी मागणारे अर्ज प्रदेश कार्यालयाकडून उपलध असतील. ज्या उमेदवारांना पक्षाच्यावतीने उभारावयाचे आहे, त्यांनी पाच दिवसात फॉर्म भरायचे आहेत. छापील फॉर्म कार्यालयात ठेवण्यात आले आहेत असे पक्षाने म्हटले आहे.