त्यांना पद दिलं, महापौर केलं ! माझं काय चुकले ? सतेज पाटलांच्या निशाण्यावर आजरेकर
schedule16 Dec 25 person by visibility 84 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या राजकारणात आता आरोप,प्रत्यारोप आणि टीकेचे फटाके फटायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी महापौर व नगरसेवकांना उद्देशून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी खडा सवाल केला. प्रभाग क्रमांक बारा येथे आयोजित कार्यक्रमात आमदार पाटील बोलत होते. माजी महापौर निलोफर आजरेकर यांना उद्देशून आमदार पाटील म्हणाले की, ‘ते, अपक्ष म्हणून निवडून आले होते. आपण त्यांना पद दिले, महापौरपद दिलं, त्यांची आर्थिक उन्नती झाली. मी, त्यांचे घर माझ्या नावावर केले नाही की त्यांचा मार्केट यार्ड येथील दुकानगाळा माझ्या नावावर केला नाही. यामुळे त्यांना विचायराला पाहिजे. ज्यांना आमचा फायदा घेतला. ते आता मत मागायला आले की विचारा, बंटी पाटील को क्यूँ छोडा ? मेरी गलती क्या थी ? त्यांना चांगल्या मनाने मी महापौर केले होते. तुमच्यावर काय अन्याय केला होता ?’अशा शब्दांत पाटील यांनी रोष व्यक्त केला. आमदार पाटील म्हणाले, ‘आता सगळया गोष्टी बाजूला ठेवू, उद्याच्या निवडणुकीत चांगली माणसं निवडूया, जी कायम आपल्या सोबत राहतील. निष्ठावंत माणसं निवडूया.’