क्रिडाई कोल्हापूरतर्फे बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी
schedule02 May 23 person by visibility 390 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : क्रिडाई कोल्हापूरतफे़॑ आंतरराष्ट्रीय कामगार दिन १मे २०२३ ॵचित्य साधून बा़धकाम कामगारांची नोंदणी व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष श्री.के.पी.खोत, उपाध्यक्ष सचिन ओसवाल, सचिव संदीप मिरजकर, खजानिस अजय डोईजड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला. क्रिडाई कोल्हापूर ही पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था आहे. बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्या बरोबर सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदा कामगार दिनाचे औचित्य साधून क्रिडाई संस्थेने सभासदांच्या बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी केली. नोंदणीचे फायदे कामगारांना समजावून सांगितले. शिबिरात मध्ये २०० कामगारांची नोंदणी करण्यात आली. सीपीआर हॅास्पिटल, लोटस मेडिकल फाउंडेशन, ओम हॉस्पिटलमार्फत कामगारांची मोफत आरोग्य शिबीर घेतले. जनरल तपासणी, रक्त, लघवी तपासणी व डोळे तपासणी केली.नोंदणी करणाऱ्या कामगारांना क्रिडाई संघटनेतर्फे प्रत्येक कामगारांना भेट वस्तू देण्यात आली.तसेच या कार्यक्रमास दिशा फॏडेशनचे सहकार्य लाभले. राधाकृष्ण मंदिर, शाहुपुरी २री गल्ली येथे कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमास मॅनेजिंग कमिटी सदस्य विजय
माणगांवकर, सभासद चेतन चव्हाण, उदय निचिते, योगेश आठल्ये , महेश ढवळे , भारतीय कर्मचारी महासंघचे अध्यक्ष दिलीप दादा जगताप, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे निरिक्षक राजेंद्र निकम, बॅक ऑफ महाराष्ट्रचे जन संपर्क अधिकारी मनमोहन राजा पाटील, सीपीआरच्या दिपा शिपुरकर, लोटस मेडिकल फाउंडेशन चे अमित गायकवाड, ओम् हॅास्पिटल चे योगी डांगे हजर होते. सचिव संदीप मिरजकर यांनी आभार मानले.