कॅफे टि कॉफ़ी हे कोल्हापुरातील पहिले समुदाय आधारित कॅफे
schedule22 Apr 23 person by visibility 662 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कॅफे टि कॉफी हा एनआय व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने लॉन्च केलेला नवीन ब्रँड आहे. एनआय व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे इतर काही ज्ञात ब्रँड म्हणजे नियाझ रेस्टॉरंट्स, गलांगल - द एशिया किचन आणि बेक्स ब्राय नियाज हा कॅफे २१ एप्रिल' २०२३ रोजी कोल्हापुरात सुरू झाला. ताराराणी चौक, कावळा नाका येथे या कॅफेचे उद्घाटन मोहिते रेसिंग अकादमीचे ध्रुव मोहिते यांच्यासह कोल्हापुरातील व्यावसायिक, प्रतिष्ठित सदस्यांच्या उपस्थितीत झाले. कॅफे टि कॉफी हे कोल्हापुरातील पहिले समुदाय आधारित कॅफे आहे. आमचे उद्दिष्ट एक स्वागतार्ह जागा तयार करणे आहे जिथे स्थानिक लोक एकत्र जमू शकतील आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि पेयांचा आनंद घेऊ शकतील.अशी माहिती
एन.आय. व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मिस्टर शबीर शहा,एन. आय व्हेंचर्स प्रा.लिमिटेडच्या मार्केटिंग हेड मिस डिंपल त्रिवेदी.कंपनीचे एक्झिक्युटिव्ह चीफ श्री रमेश यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
आम्ही चांगल्या प्रकारे तयार केलेल्या मेनूसोबत विविध प्रकारच्या कॉफी, चहा आणि कॉन्टिनेन्टल स्पेशॅलिटीज देऊ असे सांगितले.
नियाज बिर्याणी ब्रँड बनून ३३ वर्षे पूर्ण होत असताना आणि कोल्हापुरात ७ वर्षे अस्तित्वात असताना, यावर्षी नियाज कोल्हापुरातील खवय्यांसाठी त्यांची अस्सल पाककृती आणि चवीसह उत्तम जेवणाच्या अनुभवाची सुधारित आवृत्ती घेऊन येत आहे. ४० जणांना बसू शकतील अशा आसन व्यवस्था आहे. असे इर्शाद सौदागर आणि नियाज सौदागर यांनी सांगितले आहे.