सचिन पाटील, अमित हजारे यांच्या प्रचारार्थ वाशीत प्रचारफेरीचा धडाका
schedule05 Feb 26 person by visibility 50 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवसेनेचे पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार सचिन विश्वास पाटील व पंचायत समिती उमेदवार अमित आप्पासो हजारे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी, पाच फेब्रुवारी रोजी वाशी येथे रॅली काढण्यात आली. गावातील विविध भागातून काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. कार्यकर्ते व मतदार यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना मोठया मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार यावेळी मतदारांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सगळीकडे प्रचाराचा धुरळा उडाला आहे. जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील आहेत. वाशी येथे गुरुवारी सकाळी प्रचारफेरी काढण्यात आली. राजवीर नरके, पंचायत समितीचे उमेदवार अमित हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाशी कमानीपासून प्रचारफेरीला सुरुवात झाली. मातंग समाज वसाहत, पाटील गल्ली, माळी गल्ली, धनगरवाडा, हरिजन वसाहत, कुंभार गल्ली या भागातून रॅली निघाली. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना मतदान करून निवडून द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. घर टू घर जाऊन मतदारांना अभिवादन केले. पाडळी जिल्हा परिषद मतदार संघातून सचिन पाटील हे उमेदवार आहेत तर पंचायत समितीचे उमेदवार अमित हजारे आहेत या दोन्ही उमेदवारांना निवडून विकासाला गती देऊ या असे आव्हान यावेळी करण्यात आले.
या प्रचार फेरीमध्ये वाशीचे सरपंच संतोष मिठारी, उपसरपंच सागर सावंत, ग्रामपंचायत सदस्य सुहास परीट, श्रीधर कांबळे, जयसिंग पाटील, अरुण मोरे, उत्तम पाटील, संतोष पाटील, इंद्रजीत पाटील, सागर चपाले, भिकाजी पाटील, सरदार खालकर, शरद पाटील, सरदार सावंत यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.