
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शारदीय नवरात्र महोत्सवाच्या नवव्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई देवीची विश्वेश्वरी जगद्धात्री या रूपात पूजा बांधली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होतन. नवरात्रोत्सवातनऊ दिवसात देवीची विविध रूपात पूजा साकारली जाते. नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी मंगळवारी, चार ऑक्टोंबर रोजी देवीची विश्वेश्वरी जगद्धात्री या रूपात पूजा बांधली. गजानन मुनीश्वर आणि मुकुल मुनीश्वर यांनी ही पूजा साकारली आहे.