पन्हाळा येथे रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांचा स्मृतिदिन साजरा
schedule08 Feb 24 person by visibility 221 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांचे अमात्य व हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ हुकूमत्पनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या ३०८ व्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या सोहळ्यात त्यांच्या समाधीचे पूजन व पुष्प अर्पण ncc चे ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर श्री अभिजीत वाळिंबे यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्यधिकारी श्री चेतनकुमार माळी, श्री रामचंद्रपन्त अमात्य बावडेकर चॅरि्टेबल ट्रस्ट चे उपाध्यक्ष डॉ अमर अडके, सचिव श्री नीलराजे बावडेकर, विश्वस्त श्री विजय पाटील, श्री विश्वनाथ कोरी, श्री रवींद्र धडेल, सौ रुपाली धडेल, नितुदेवी बावडेकर, श्रीमती माधवी राजे पुरोहित व इतिहास प्रेमी उपस्थित होते. या वेळी श्रीमंत माईसाहेब बावडेकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर नाट्य सादर केले