कोल्हापुरातील वसतिगृहे शाहू महाराजांच्या द्रष्टेपणाचे प्रतीक
schedule18 Dec 23 person by visibility 235 category
नेर्लीच्या शेतकरी कुटुंबातील कन्येचा यूपीएससीच्या परीक्षेत लख्ख यश
schedule05 Aug 20 person by visibility 490 categoryलाइफस्टाइल
……………………….
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
तीन वर्षापूर्वी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. पहिला प्रयत्न असफल ठरला. अपयश आले म्हणून पुन्हा नेटाने अभ्यास केला आणि दुसऱ्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले. नेर्ली येथील शेतकरी कुटुंबांतील डॉ. प्रणोती संकपाळ यांचा हा यशस्वी प्रवास.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०१९ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल चार ऑगस्ट रोजी जाहीर झाला. या परीक्षेत डॉ. संकपाळ या ५०१ व्या रँकने परीक्षा उत्तीर्ण झाल्या. शेतकरी कुटुंबांतील मुलीचा हा सक्सेस मंत्रा आपसूकच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यासाठी प्रेरणादायी आहे.
डॉ. संकपाळ यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे हा मनाशी संकल्प केला होता. अअभ्यासासाठी पुणे गाठले. दिल्लीत जाऊन मुलाखत प्रक्रियेची तयारी केली. मनात जिद्द असेल तर यश मिळवता येत हे त्यांनी दाखवून दिले.
प्रणोती ही पहिलीपासूनच हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जायची. दहावीला ९५ टक्के गुण मिळवले. विवेकानंद कॉलेजमधून अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेतले. बारावीला विज्ञान शाखेत ८९ टक्के गुण घेतले. बारावीनंतर सांगली येथील भारती विद्यापीठातून बीडीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
प्रशासकीय सेवेत करिअर करायचं असा मनाशी ठाम संकल्प करुन २०१७ मध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाला सुरुवात केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पहिल्या प्रयत्नात अपयश झाले. पहिलाच प्रयत्न, पदरी अपयश मात्र खचून न जाता पुन्हा नव्याने अभ्यासक्रमाला सुरुवात केली.
अभ्यासाचे टाइमटेबल तयार केले. २०१९ मध्ये आयोगाची परीक्षा दिली. दुसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली. डॉ. प्रणोती या शेतकरी कुटुंबांतील. त्यांच्या यशाचा आनंद प्रत्येकाला झाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातील परीक्षेच्या यशाविषयी प्रणोती म्हणतात,‘ यूपीएससी परीक्षेतील यशासाठी अभ्यासातील सातत्य हे महत्वाचे आहे. अभ्यासक्रमाचे योग्य वेळापत्रक, अभ्यासातील सातत्य हेच यशामागील रहस्य आहे. कुटुंबीयांनी मला सातत्याने प्रोत्सहित केले.त्यामुळे यशाची गुढी उभारु शकले. हे यश केवळ माझ्या एकटीचे नाही. ते माझ्या कुटुंबीयांचे आहे. माझ्या यशात कुटुंबीय व मित्रमंडळीचा मोलाचा वाटा आहे.’