Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शहीद महाविद्यालयातील गोपिकांचा जल्लोष, डी फार्मसी विभागाच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडीटीडीएफ, माध्यमिक शिक्षक संघ, विवेकानंद संस्थेतर्फे रविवारी पुरस्कार वितरण समारंभविधी परीक्षेत धन्वंतरी पाटील शिवाजी विद्यापीठात प्रथमयुवा स्पोर्ट्स, गारगोटी मंडळाच्या गणेशमुर्तीचे थाटात आगमणगणेशोत्सव... माय मराठीचा गजर अन पुस्तकाची निर्मिती ! छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाची बातच न्यारी !!गोकुळमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ, महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटेल ! मुख्यमंत्री मार्ग काढतील !! - मंत्री हसन मुश्रीफ'दिलखुलास’मध्ये  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांची विशेष मुलाखतजिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन ४०० शिक्षक, नियुक्ती पत्रे प्रदानभाऊसिंगजी रोडवरील जागा विकसितचा निर्णय सतरा सप्टेंबरच्या बैठकीतकोल्हापूर महापालिकेने केली पाणीपट्टीत वाढ, एक ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

जाहिरात

 

शहीद महाविद्यालयातील गोपिकांचा जल्लोष, डी फार्मसी विभागाच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी

schedule12 Sep 26 person by visibility 8 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन  : राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाची दहीहंडी केवळ विजयाचा जल्लोष ठरला नाही, तर परंपरेला छेद देत धाडसी विद्यार्थिनींनी साकारलेल्या शौर्याचे दर्शन घडविणारा ठरला.

      मुलांचाच खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहीहंडी स्पर्धेत डी. फार्मसी विभागाच्या ‘गोपिकांनी’ सलग दुसऱ्या वर्षी मानाची दहीहंडी फोडत आपले वर्चस्व कायम राखले. हंडी फोडताच परिसरात जल्लोषाचा स्फोट झाला आणि ‘जय गोपाळकृष्णा!’च्या जयघोषाने अवघे मैदान दुमदुमून गेले.

      या स्पर्धेत बीसीए, बीएस्सी आयटी, डीएमएलटी, आर्किटेक्चर, बीएस्सी मायक्रो आणि नर्सिंग या विभागांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वच संघांनी चार स्तरांपर्यंत सलामी देत आपले कौशल्य दाखविले. मात्र तिसऱ्या फेरीत डी. फार्मसी विभागाच्या विद्यार्थिनींनी ताकद, आत्मविश्वास आणि एकजुटीचे अप्रतिम दर्शन घडवत दहीहंडी फोडली. त्यांच्या या कामगिरीने ‘गोपिकांचा जल्लोष’ म्हणून या सोहळ्याची विशेष नोंद झाली.

 प्राचार्य प्रशांत पालकर यांनी विद्यार्थिनींच्या धाडसी कामगिरीचे कौतुक करताना सांगितले, गोपिकांनी आज आपल्या जिद्दीने आणि संघभावनेने दहीहंडी फोडत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आव्हान कितीही मोठे असले तरी एकजुटीने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, हे विद्यार्थिनींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यांचा हा विजय शहीद महाविद्यालयाच्या कर्तृत्वाची नवी ओळख निर्माण करणारा  संगणकशास्त्र विभाग व एनएसएस विभागाने कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. अविनाश पालकर व प्रा. ज्योती शिंदे यांनी काम पाहिले. याप्रसंगी प्राचार्य स्नेहल माळी, प्राचार्य सरिता धनवडे, प्राचार्य मयुरी महेकर, उपप्राचार्य सागर शेटगे, प्राचार्य सागर भाट, प्रा. विशालसिंह कांबळे विनायक पाटील उपस्थित होते.

रोटरी क्लबतर्फे शाळांना साहित्य प्रदान

schedule09 Nov 20 person by visibility 877 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : रोटरी इंटरनॅशनल ग्लोबल ग्रँटच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रामप्रताप झंवर चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने महापालिकेच्या शाळांना शौचालये प्रदान करण्यात आली. प्रांतपाल संग्राम पाटील, रविकिरण कुलकर्णी, उद्योजक रामप्रताप झंवर, गिरीष जोशी,डॉ. मेघराज चुघ यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी सिद्धार्थ पाटणकर, सुभाष मालू, अरविंद किश्नन, विजय घोरपडे, निलेश पटेल, प्रशासनाधिकारी शंकर यादव, इंजिनीअर प्रमोद चौधरी, दत्तात्रय पाटील उपस्थित होते.


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes