शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. परिपत्रक
schedule10 Jun 23 person by visibility 500 category
• शिवाजी विद्यापीठातील अधिविभागप्रमुख / संचालक / समन्वयक यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, आपण
कोणत्याही प्रकारच्या रजेवर जाण्यापूर्वी आपल्या रजा कालावधीतील अधिविभागाचा कार्यभार सेवाज्येष्ठतेनुसार अन्य
शिक्षकांकडे सोपविण्याकरीता रजेचा अर्ज हा मा. प्र-कुलगुरु कार्यालयाकडे सादर करावा. ही शिफारस मान्य झाल्यानंतर
आपण रितसर कार्यभार सोपवावा आणि आपला रजेचा अर्ज आस्थापना पीजी विभागास सादर करावा.
आपणाकडे एखाद्या अधिविभागाचा/केंद्राचा/अध्यासनाचा अधिकचा कार्यभार असल्यास आपली रजा ही आपल्या मुळ
अधिविभागातून रितसर येणे आवश्यक आहे. तसेच आपल्याकडे सोपविण्यात आलेल्या अधिकच्या विभागाच्या कार्यभाराबाबत
संबंधित विभागातील अन्य शिक्षकांकडे कार्यभार सोपविण्याकरीता रजेच्या अर्जासोबत स्वतंत्र पत्र प्र-कुलगुरु कार्यालयाकडे
सादर वेत.